#pmcpune #baner #balewadi #pashan – Sinhasan News

२५ वर्षांपासून प्रलंबित बाणेर-पाषाण लिंक रोडचा प्रश्न अवघ्या तीन महिन्यांत मार्गी लागला – नगरसेवक पुनीत जोशी
पुणे : शहराच्या पश्चिम भागातील बाणेर-पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर-पाषाण लिंक रोडचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेवक पुनीत जोशी यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेत अवघ्या तीन महिन्यांत मार्ग काढला आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला. या बद्दल पुनीत जोशी यांनी महापालिका प्रशासनाचे विशेष आभार मानले.

पुनीत जोशी यांनी म्हटले की, “बाणेर-पाषाण लिंक रोडसंदर्भात मांडलेल्या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेत अवघ्या तीन महिन्यांत मार्ग काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला, याचा विशेष आनंद आहे.” या कामासाठी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! तसेच या कामात सहकार्य करणाऱ्या नगरसेविका मयुरी कोकाटे आणि रोहिणी चिमटे यांचेही विशेष आभार मी व्यक्त करतो.

पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच पथ विभाग, अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सर्वांच्या समन्वयातून हा प्रश्न मार्गी लागला, असे जोशी यांनी नमूद केले.

जोशी म्हणाले,हा रस्ता विकास आराखड्यानुसार (डीपी) ३६ मीटर रुंदीचा असून बाणेर आणि पाषाण भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दीर्घकाळ भूसंपादनाच्या अडचणींमुळे तो रखडलेला होता. अलीकडच्या काळात प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून आणि संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून उर्वरित कामाला गती दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन अडचणी जाणून घेतल्या, तर स्थानिक नगरसेविका मयुरी कोकाटे आणि रोहिणी चिमटे यांच्या पाठपुराव्यानेही प्रकल्पाला गती मिळाली.

या रस्त्यामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम पुण्यातील वाढत्या वाहतुकीच्या दाबाने निर्माण होणाऱ्या कोंडीत या लिंक रोडमुळे लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

नगरसेवक पुनीत जोशी यांनी सर्व संबंधित पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याचे कौतुक करत या प्रकल्पामुळे परिसरातील विकासाला चालना मिळेल, असे सांगितले.