pune city – Sinhasan News

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी महापालिका सभागृहात मांडली आपली स्पष्ट भूमिका..
पुणे महानगरपालिका सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झाली चर्चा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम आणि मुद्देसूद भूमिका मांडली.

यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर यांनी शिवसृष्टी प्रकल्पाचा मुद्दा विशेषत्वाने उपस्थित केला. ते म्हणाले, “माझे वडील, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याची संकल्पना मांडली होती. पुणे महानगरपालिकेत यावर ठराव करण्यात आला असून तेव्हापासून दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी.डी.पी. झोनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचे आश्वासन दिले होते; मात्र शासन स्तरावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पुणे शहरात मोठे प्रकल्प राबवले जात असताना शिवसृष्टी प्रकल्पासाठीही आग्रही भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी.”आहे ते म्हणाले.

पुणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता नियोजन वास्तववादी आणि परिणामकारक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अंदाजपत्रकातील सकारात्मक बाबींचे स्वागत करतानाच अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणि जबाबदारीची मागणी त्यांनी केली. पायाभूत सुविधांबाबत बोलताना शहरातील वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्यांवरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणीपुरवठा विषयावर समान पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पाणी गळती रोखणे आणि टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मानकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत बायोगॅस आणि झिरो स्लजसारख्या योजनांचे स्वागत करतानाच प्रत्यक्षात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे समस्या गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.आरोग्य क्षेत्रात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांच्या घोषणांचे स्वागत करताना त्यांनी मनपाच्या अनेक रुग्णालयांमध्ये केवळ ओपीडीपुरत्याच सेवा उपलब्ध असल्याची बाब मांडली आणि सर्व सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रभागातील दवाखान्यातही विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महिला सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत करताना जुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करण्यावरही त्यांनी भर दिला. शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. पर्यावरणाच्या दृष्टीने १० लाख झाडे लावण्याच्या संकल्पाचे स्वागत करत त्यांनी ती झाडे जगविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच आदरणीय अजितदादा पवार यांचे नाव शहरी गरीब योजनेला दिले त्याबद्दल दादांचा कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त केले.

बी.डी.पी. झोनमधील जागांचा वापर करून सीएसआरच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यास अनधिकृत बांधकामांवरही आळा बसेल, असे त्यांनी सुचवले. आर्थिक बाबींवर बोलताना मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, सामान्य नागरिकांप्रमाणेच मोठ्या व्यावसायिकांवरही कठोर कारवाई करून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. चर्चेच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “अंदाजपत्रक कागदावर आकर्षक असले तरी त्याची खरी कसोटी अंमलबजावणीत आहे. पुणेकरांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष परिणाम हवेत.” प्रत्येक प्रकल्पासाठी स्पष्ट वेळापत्रक, जबाबदारी आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुणे शहराचा विकास सर्वसमावेशक आणि सर्व घटकांपर्यंत पोहोचणारा असावा, हीच अपेक्षा मानकर यांनी व्यक्त केली.

एसएनडीटी मध्ये महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती, एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे आणि मानसी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानार्थ प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजकार्य व महिला सशक्तीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवर महिलांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्ती म्हणून प्रा.शीतल मोरे आणि  शुभदा गोडबोले यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या मानपत्राचे वाचन प्रज्ञा वझे आणि  स्मिता कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमात सीए सर्वेश मेहंदळे यांनी “स्त्रीचे मनोबल आणि सकारात्मकता” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नितिन शेलार यांनी मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत स्वसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकाला उपस्थित विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृतीचे प्रेसिडेंट रो. मोहन टिलू, सेक्रेटरी रो. स्मिता कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. संतोष परदेशी.
तसेच इतर सभासद उपस्थित होते. एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्सच्या वतीने प्राचार्य गणेश चव्हाण, प्रा. अनुजा किणीकर व इतर प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. मानसी फाऊंडेशनच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष सौ. मानसी ठाकूर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा भिसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे मनोबल वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर..
पुणे : गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज १६ मार्च २०२६ रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव १७ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे.

लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८१ च्या नियम ५४अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक १८० दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

पुढील काळातही अधिक प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत राहू : प्रवीण बढेकर
बढेकर ग्रुपचा १६ वा वर्धापनदिन सोहळा भावनिक वातावरणात साजरा..आजोबांच्या हस्ते कापण्यात आला केक

पुणे. : पुणे शहरातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या बढेकर ग्रुपचा १६ वा वर्धापनदिन सोहळा नुकताच बढेकर कार्यालयात साधेपणात पण अत्यंत भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी प्रविण बढेकर यांचे आजोबा फक्कडराव शंकरराव बांगर यांच्या हस्ते केक कापून हा सोहळा साजरा करण्यात आला.

या सोहळ्याने केवळ संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा टप्पा साजरा झाला नाही, तर पिढ्यान्‌पिढ्यांचा संस्कार, मूल्ये आणि विश्वास यांचा सन्मानही व्यक्त झाला. उपस्थित सर्वांसाठी हा क्षण अत्यंत प्रेरणादायी ठरला.

१६ वर्षांच्या प्रवासात Badhekar Group ने विश्वास, गुणवत्ता आणि जबाबदारी या मूल्यांवर आधारित कामगिरी करत अनेक कुटुंबांची घराची स्वप्ने साकार केली आहेत. या वाटचालीत मार्गदर्शकांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांची मेहनत आणि हितचिंतकांचा विश्वास हेच संस्थेचे खरे बळ ठरले आहे.

या प्रसंगी प्रविण बढेकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “आजोबांच्या हस्ते केक कापला जाणे हा आमच्यासाठी केवळ वर्धापनदिनाचा क्षण नाही, तर आमच्या मूल्यांची आणि संस्कारांची पावती आहे. याच बळावर पुढील काळातही अधिक प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत राहू.”

अर्थपूर्ण अशा या वर्धापनदिन सोहळ्याने बढेकर ग्रुपच्या १६ वर्षांच्या विश्वासार्ह प्रवासावर एक भावनिक शिक्का उमटवला.

आम्ही जनतेसाठी 24×7 उपलब्ध आहोत आणि राहणार..कामाच्या जोरावर जनता आमच्या पाठीशी उभी राहील : प्रभाग 10 भुसारी कॉलनी बावधन मधील भाजप उमेदवारांना विश्वास
कोथरूड : – प्रभाग १० भुसारी कॉलनी बावधन मधील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही २४x७ उपलब्ध होतो, आहे आणि यापुढेही राहणार आहोत, आम्ही केलेली विकास कामे, अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांची केलेली सोडवणूक यामुळे प्रभागातील जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास भाजपच्या उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.

भाजपच्या उमेदवारांचा प्रभागात प्रचारकाचा धडाका सुरू असून  भाजपाचे उमेदवार किरण दगडे पाटील, अल्पना गणेश वरपे, रुपाली सचिन पवार, दिलीप वेडेपाटील हे केलेली विकास कामे आणि सुरू असलेले लोकोपयोगी प्रोजेक्टचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत.

उमेदवारांनी महात्मा सोसायटी, सारथी शिल्प, मंगलधाम सोसायटी, वृंदावन, रोहन गार्डन, हरिप्लाझा, कुंबरे पार्क, हील व्हिव, जिजाई नगरी, मौर्य विहार आदी परिसरातील सोसायट्यांना भेटी देत  नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटी दरम्यान नागरिकांच्या मनातील अपेक्षित विकासावर चर्चा करून नागरिकांचे म्हणणे उमेदवारांनी ऐकूण घेतले.

या दौऱ्यात अनेक वर्षापासून डिपी रस्त्यावरील रखडलेल्या एकलव्य कॉलेज जवळील रस्ता, मौर्य विहार रस्ता, हायवे ते महात्मा सोसायटी जोडणारा रस्ता, आशिष गार्डन ते शांतीबन चौक या रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.  आगामी काळात नागरिकांना आवश्यक प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच नागरी सुविधा नियोजनपूर्वक पुरवण्यावर आमचा भर राहिल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

तेजल दुधाने यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कर्वेनगर मधील निवडणूक रंगतदार होणार..
तेजल दुधाने यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम.. क गटात चुरशीच्या लढतीचे चित्र

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी प्रभाग क्रमांक 30 मध्ये लक्ष लागले होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कापण्यात आलेल्या तेजल दुधाने नक्की काय भूमिका घेणार याकडे..मात्र तेजल दुधाने यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत क गटातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कर्वेनगर मधील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तेजल दुधाने अपक्ष निवडणूक लढवणार असल्याने त्या लढत असलेल्या क गटातच नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी मधील निवडणुकीवर त्याचे परिणाम दिसून येतील असे बोलले जात आहे. तेजल दुधाने मागील अनेक वर्षापासून या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होत्या. आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून त्यांच्या पाठीमागे मोठे महिला संघटन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या या भागातील ओळख होत्या. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र ऐनवेळेस त्यांची उमेदवारी कापण्यात आली.

उमेदवारी कापण्यात आल्यानंतर त्यांनी घेतलेला मेळाव्यात कर्वेनगर मधील अनेक महिला व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शवला होता तर अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले होते. या मेळाव्यानंतर त्या अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात होते आणि आज अर्ज माघार घेण्याचे दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्या अपक्ष उमेदवार असणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

तेजल दुधाने अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या क गटात भाजप कडून तेजश्री महेश पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवेदिता शैलेश जोशी, शिवसेनेकडून प्रतीक्षा जावळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मनिषा विरेश शितोळे, काँग्रेस- मनसे- शिवसेना (उबाठा) आघाडी कडून वैशाली दिघे या महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेजल दुधाने यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे या गटातील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा कर्वेनगर परिसरात आहे.

वारजेत भाजपला धक्का ; माजी नगरसेवक किरण बारटक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर..
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर

अमोल साबळे

वारजे : वारजे पॉप्युलर नगर प्रभाग क्रमांक ३२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. या प्रभागात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवकांचा प्रवेश घेत आपल्या पक्षात घेतल्याने पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या प्रभागातून भाजपकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक व भाजप पुणे शहर उपाध्यक्ष किरण बारटक्के यांना डावलण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांना मध्ये नाराजीचा सूर आहे. आज नाराज किरण बारटक्के काय निर्णय घेण्यात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. किरण बारटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मजबूत होणार आहे.

वारजेतील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप कडून सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सायली वांजळे, तसेच दिलीप बराटे यांचे पुतणे भारतभूषण बराटे यांचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप जिवंत ठेवण्याचं काम ज्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले  त्यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अन्याय करण्यात आला असून या प्रकारामुळे भाजप गोटात नाराजीचा सूर आहे.

उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने माजी नगरसेवक व भाजपचे पुणे शहर उपाध्यक्ष किरण बारटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली आहे. किरण बारटक्के यांचा राष्ट्रवादीचा निर्णय भाजपला धक्का ठरू शकतो. ही वारजेतील भाजपच्या मनसुब्यांना छेद देण्यासाठी राष्ट्रवादीची  मोठी खेळी असणार आहे. किरण बारटक्के या भागातून नगरसेवक राहिलेले आहेत. प्रत्येक भागात त्यांचा दांडगा संपर्क आहे. सातत्याने ते समाजपयोगी उपक्रम राबवत आलेले आहेत. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे सचिन बराटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ या प्रभागात तगडा पॅनल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतः व त्यांच्या पत्नी दीपाली धुमाळ या प्रभागात नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे एक चांगला पॅनल राष्ट्रवादीचा या ठिकाणी पाहिला मिळू शकतो.

पुण्यात भाजपचे उमेदवारांना डायरेक्ट एबी फॉर्म..सावध भूमिका घेत यादी जाहीर करणे टाळले.. कोथरूडमध्ये हे असणार उमेदवार
कोथरुड :  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप पक्षाने सावध भूमिका घेत उमेदवारी यादी जाहीर न करता उमेदवारांना डायरेक्ट एबी फॉर्म देणे चालू केले आहे. काल पासून इच्छुक उमेदवार अंतिम उमेदवारी यादी जाहीर होण्याचे वाट पाहत होते. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीपासूनच काही उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले असून आज सकाळपासून फायनल केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मसाठी फोन येऊ लागले असल्याचे माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी नविन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे दिसत आहे.

भाजपने उमेदवारी यादी जाहीर करणार असे सांगत इच्छुक उमेदवार व विरोधी पक्षांना गाफील ठेवले होते. शिवसेने बरोबर युतीच्या वाटाघाटी सुरू असल्याची कालपर्यंतची बातमी होती. पण आज अचानक एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाल्याने कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू झाला आहे. आता शिवसेनाही एबी फॉर्म द्यायला सुरुवात करणार का हे पाहावे लागणार आहे. भाजपच्या जाहीर झालेले उमेदवार पाहता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्ये सुसूत्रता दिसून येत असून पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली असल्याचे दिसत आहे. काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांना झटका बसला आहे. काही धडाडीच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने पुढील निवडणुकीची वाट पहावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार

प्रभाग क्रमांक 9 बाणेर पाषाण, सुस मध्ये अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहूल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी मध्ये किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे, रूपाली सचिन पवार

प्रभाग क्रमांक ११ केळेवाडी मध्ये अजय मारणे, अभिजित राऊत, शर्मिला शिंदे

प्रभाग २९ मध्ये डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी मध्ये पुनीत जोशी, मीताली कुलदीप सावळेकर, मंजुश्री खर्डेकर, एका नावावर चर्चा सुरू आहे.

प्रभाग ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनीमध्ये राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, रेश्मा संतोष बराटे, तेजश्री महेश पवळे

प्रभाग क्रमांक ३१ कोथरूड मयुर कॉलनी मध्ये पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती नवनाथ जाधव, हर्षाली माथवड

प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर सचिन दोडके, भारतभूषण बराटे, सायली वांजळे, हर्षदा भोसले

प्रमोद शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (श प.) पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा
कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य व राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे माजी अध्यक्ष
प्रमोद शिंदे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. येणारी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन लढवणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कालच पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  आज प्रमोद शिंदे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवला आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने घेतलेल्या सरकार विरोधात घेतलेल्या अनेक आंदोलनात सहभागी होत या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद वाढवली. राष्ट्रवादीत दोन भाग पडल्यानंतर शरद पवार यांच्या बरोबर राहिलेल्या कार्यकर्त्यांनी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत पक्षाची बाजू खंबीरपणे न डगमगता मांडत संघर्ष केला.

या येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळेल असे वाटत असताना आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे पक्षासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते निराश झाले असून त्यातून राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे.

प्रमोद शिंदे यांनी दिलेले राजीनामा पत्र

एकलव्य विद्या संकुलास राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराकडून मदतीचा हात..
पुणे : वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत एकलव्य विद्या संकुल या आश्रमशाळेस राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराच्या वतीने मदत देण्यात आली. ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य व २५ हजार रोख मदत देण्यात आली.

राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून थंडीसाठी उपयोगी कपडे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेकडो ब्लॅंकेट जमा झाले होते. याचे वस्तूंचे गरजूंना वाटप करण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील वंचित विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुल या संस्थेस मदत ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य, २५ हजार रुपये रोख मदत देण्यात आली. तुळजापूर येथील संस्थेच्या संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढेही या संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू.

या यमगरवाडी प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, बाप्पु मानकर यांचे या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, आपला वाढदिवस अथवा इतर आठवणींच्या दिवशी संस्थेच्या मुलांसाठी मदत केल्यास हे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल.

यावेळी यमगरवाडी प्रकल्पाचे पुणे येथील समन्वयक राजेंद्रजी कुलकर्णी, रा. स्व. संघाच्या समर्थ भारतचे विनोदजी खरे, एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोल्हटकर सर, वसतिगृह समन्वयक फुलाजी ताटीकुंडलवार, विद्यार्थी, सहकारी व राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

यमगरवाडी प्रकल्पाविषयी

एकलव्य विद्या संकुल हे यमगरवाडी प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकलव्य विद्या संकुल चालवले जाते. येथील आश्रमशाळेत चालणारे कार्य आणि त्यासाठी घेतले जाणारे परिश्रम मोलाचे आहेत. समर्पित भावनेने केले जाणारे कार्य समाजात किती मोठा बदल घडवू शकते याची प्रचिती येथे भेटी दरम्यान येते.

१९९३ साली लातूर भूकंपाच्या काळात सेवाकार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भटक्या-विमुक्त समाजाची परिस्थिती पाहून, संघपरिवाराच्या माध्यमातून या संस्थेची वाटचाल सुरू केली. मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या या भटक्या समाजाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवनमान शिक्षणाच्या माध्यमातून उंचावण्याचा संकल्प संस्थेने केला. सुरुवातीला हे विद्यार्थी शिकण्यासाठी तयार होणेही अवघड असताना, अवघ्या २४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था आज ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.

भटक्या-विमुक्त समाजातील ५२ पैकी ३८ जनजातींचे हजारो विद्यार्थी येथे शिकून, समाजात सन्मानाची नोकरी करीत आहेत. अनेक विद्यार्थी आज सरकारी अधिकारी, अभियंते आणि डॉक्टर बनले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे विशेष लक्ष दिले जाते. येथील शेकडो विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देशपातळीवर विजयी झाले आहेत.