#punenews #maharashtra kesari #kustispardha #MuralidharMohol #महाराष्ट्र केसरी #कुस्ती स्पर्धा – Sinhasan News

अखेर ठरलं ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुण्यातील कोथरूडमध्ये ; वाद मिटला, संस्कृती प्रतिष्ठानकडे आयोजनाची जबाबदारी
पुणे : महाराष्ट्र केसरी संदर्भात निर्माण झालेला वाद आता मिटला असल्याने ही स्पर्धा कोथरुड मध्येच संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनाखाली होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पुणे व कोथरूडकर कुस्ती शौकिनांचे या स्पर्धेबाबत असणारे स्वप्न पूर्ण होणार आहे. ११ ते १५ जानेवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद नेमकी कोणाची यावरून वाद निर्माण झाला या वादावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला. बाळासाहेब लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा भारतीय कुस्ती महासंघाकडे दिला आहे. शरद पवार व बाळासाहेब लांडगे यांना आश्रयदाते म्हणून कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कुस्तीगीर परीषदेचं काम नवीन कार्यकारिणी पाहणार आहे.

महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचं आयोजन करण्या संदर्भातील पत्र आज नवी दिल्ली येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण सिंह यांच्या हस्ते माजी महापौर व संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारले.

राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके यावेळी होते. यावेळी मोहोळ यांनी बृजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रणही दिलं असून त्यांनी ते स्विकारलही आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ कुटुंबियांकडे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा  प्रयत्न करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.