#punenews #pmc #dipalidhumal #शहरी गरीब योजना #ncp – Sinhasan News

पुणे शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा : दिपाली धुमाळ
पुणे :  पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात  सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली शहरी गरीब योजना गरजूंसाठी लाभदायक ठरलेली योजना आहे. गेले अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे पुणे शहरात ही योजना चालू आहे. परंतु शहरी गरीब योजनेचे कार्ड फक्त महापालिकेत एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी पुणे शहराच्या चारही दिशांना शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले असून याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.  शहरी गरीब योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली आणि यशस्वी ठरलेली एकमेव योजना आहे. सर्वसामान्य, गोरगरीब नागरिक व दारिद्रयरेषेखालील नागरिक यांना या योजनेचा अनेक वर्षांपासून लाभ मिळत आहे. एक एप्रिलला आर्थिक वर्ष चालू झाल्यानंतर शहरातील अनेक नागरिकांनी शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महानगरपालिकेकडे धाव घेतली आहे. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या तळमजल्यावर शहरी गरीब योजनेचे कार्यालय असून या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी लांब रांग होऊन कार्ड काढण्यास वेळ जात असल्याने नागरिकांची चिडचिड होऊन त्यामधून वादाचे प्रसंग देखील घडत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेली पुणे महानगरपालिका आहे. त्यामुळे हे कार्ड देण्यासाठी शहराच्या विविध ठिकाणी सोय उपलब्ध करून देणे गरजेचे बनले असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

खडकवासला,कोंढवे-धावडे, उत्तमनगर, शिवणे, नऱ्हे आंबेगाव, नादोशी, नांदेड, किरकीट वाडी, वाघोली, फुरसुंगी, उरुळी देवाची, लोहगाव कात्रज इत्यादी महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधून व शहराच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी महापालिकेत येत असतात. महानगरपालिकेच्या सेवा सुविधा व योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महानगरपालिकेचे त्या त्या परिसरामध्ये क्षेत्रीय कार्यालय मिळकत कर भरणा केंद्र अशा प्रकारचे विविध कार्यालये आहेत.  अशा शहराच्या चारही बाजूस असलेल्या कार्यालयांमध्ये शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध केल्यास त्याच परिसरात नागरिकांना सदर योजनेचे कार्ड मिळेल तसेच ही योजना सुटसुटीतपणे व अधिक सक्षमपणे राबविली जाईल त्यामुळे या विषयाबाबतीत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.