#punenews – Sinhasan News

दिवंगत श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोथरूडमध्ये अभ्यासिका
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

पुणे : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूड मध्ये अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. दिवंगत सहकारी श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात येत असून, या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा प्रयत्न आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा एक अद्ययावत सोईसुविधांनीयुक्त अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प होता.

त्यानुसार, कोथरुड मधील कर्वेनगर भागात ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असून, सर्वप्रकारच्या सोईसुविधांनी युक्त असे आणि अतिशय माफक शूल्क आकरण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे, त्यांच्या संघर्षाला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या यशाच्या प्रवासात हातभार लागावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरेल आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग सुकर करेल, असा विश्वास आहे,” असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, एका सहकाऱ्याच्या स्मृतींना सामाजिक उपक्रमातून जिवंत ठेवत विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा ना. चंद्रकांत पाटील यांचा हा उपक्रम श्रीपाद ढेकणे यांना समर्पित भावपूर्ण आदरांजली ठरला आहे.

पुणे धावले एकतेसाठी… पुणेकर एकवटले नशामुक्तीसाठी !‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांचा अभूतपूर्व सहभाग!
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन; देशभक्तीचा जल्लोष, नशामुक्त युवा भारताचा संकल्प

२१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंचे वर्चस्व; भारतीय गटात सुनील कुमार आणि रविना गायकवाड अव्वल

पुणे : पहाटेची गुलाबी थंडी… धावपटुंचा सळसळता उत्साह… तरुणाईच्या मोठ्या सहभागाने भारावलेले वातावरण… नशामुक्त युवा भारतच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन एकाच ध्येयाने धावण्यासाठी सज्ज झालेले हजारो पुणेकर! रविवारी सकाळी पुण्याच्या मध्यवर्ती अलका चौकात देशभक्ती, उत्साह आणि क्रीडाप्रेमाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’मध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य जागर केला. तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, महिला आणि विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती यामुळे संपूर्ण पुणे शहर जणू एकतेच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, युवा पिढीला नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रेरित करणे आणि सशक्त, निरोगी समाजाचा संदेश देणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.

पहाटेपासूनच अलका चौक आणि परिसरात धावपटूंची मोठी गर्दी होऊ लागली होती. विविध वयोगटांतील नागरिक, देश-विदेशातील व्यावसायिक धावपटू, विद्यार्थी, युवक-युवती आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीने परिसराला जणू एखाद्या भव्य क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. धावपटूंच्या चेहऱ्यावरील उत्साह, उपस्थितांचा जल्लोष आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनीही या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि खेलरत्नने सन्मानित अंजली भागवत यांच्या विशेष उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले, राष्ट्रीय खेळाडू मनोज एरंडे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय धावपटूंची दमदार कामगिरी; २१ किलोमीटरमध्ये चुरशीची लढत

या भव्य मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील नामांकित धावपटूंनी सहभाग घेतला. २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय पुरुष गटात येगो इसॅक किप्रोनो याने १ तास ४ मिनिटे १७ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. केमेई पॉल याने १ तास ४ मिनिटे ४१ सेकंद वेळेसह द्वितीय, तर केनियाच्या एल्कनाह किमेली अरुसेय याने १ तास ८ मिनिटे ५७ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.

महिलांच्या २१ किलोमीटर आंतरराष्ट्रीय गटात त्सेहाय देसालेग्न अधाना हिने १ तास १७ मिनिटे ४५ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. सेनयित अयेले अलेमु हिने द्वितीय स्थान मिळवले, तर मुरीुकी जेन वांजिरू हिने १ तास १९ मिनिटे ४६ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला.

भारतीय गटात सुनील कुमार आणि रविना गायकवाड यांची बाजी

भारतीय पुरुष गटात सुनील कुमार याने १ तास ४ मिनिटे २२ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. शिवम सिंग तोमर याने १ तास ४ मिनिटे ५२ सेकंद वेळेसह द्वितीय, तर राजन यादव याने १ तास ५ मिनिटे ३४ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला.

महिलांच्या भारतीय गटात रविना विजय गायकवाड हिने १ तास १७ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी संजय जदाल हिने अवघ्या चार सेकंदांच्या फरकाने १ तास १७ मिनिटे ४२ सेकंद वेळेसह द्वितीय स्थान मिळवले, तर रिनू हिने १ तास १८ मिनिटे १८ सेकंद वेळ नोंदवत तृतीय क्रमांक मिळवला. भारतीय धावपटूंमधील ही चुरस स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली.

दिग्गज क्रीडापटूंच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विजेत्या धावपटूंचा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, शांताराम जाधव, बजाज फिनसर्वचे प्रमुख संजीव बजाज, बुद्धिबळ ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, स्मिता शिरोळे यादव, ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार, महादेव सपकाळ यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

केवळ मॅरेथॉन नव्हे, राष्ट्रीय एकात्मतेचा महासंकल्प!

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांचे एकीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची आठवण या एकता दौडच्या माध्यमातून करून देण्यात आली. राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, युवकांना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र आणणे आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ही एकता दौड केवळ क्रीडा स्पर्धा न राहता राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य उत्सव ठरली.

‘पुणेकरांचा प्रतिसाद हीच आमच्या संकल्पाची खरी ताकद’ – मुरलीधर मोहोळ

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजक म्हणाले,“नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत राष्ट्रीय एकात्मता आणि नशामुक्त युवा भारताचा संदेश देण्यासाठी ‘पुणे रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या एकता दौडमध्ये ४० हजारांहून अधिक पुणेकरांनी सहभागी होत राष्ट्रीय एकात्मतेचा अभूतपूर्व जागर केला. देशाच्या एकीकरणासाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले ऐतिहासिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीने नशामुक्त, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुणेकर कोणत्याही चांगल्या संकल्पनेला नेहमीच भरभरून साथ देतात, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. या ऐतिहासिक प्रतिसादाबद्दल सर्व धावपटू, क्रीडाप्रेमी आणि पुणेकरांचे मनःपूर्वक आभार!”

‘देशाची एकता आणि अखंडता टिकवणे ही सर्वांची जबाबदारी’ – रवींद्र चव्हाण

रविंद्र चव्हाण म्हणाले,“‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडचे देशभरात आयोजन करण्यात आले असून, पुण्यात या उपक्रमाला पुणेकरांचा उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद मिळाला. कोणतीही सकारात्मक संकल्पना पुण्यातून सुरू होते, तेव्हा तिला नेहमीच मोठा पाठिंबा मिळतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. सध्या समाजात ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून आक्रोश निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत देश अखंड ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

शिवाजीनगर बस स्थानकाचे अत्याधुनिकरण होणार;पीपीपी मॉडेलद्वारे महा-मेट्रो आणि एमएसआरटीसीचा करार
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक एसटी बसस्थानक पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करार, आज (४ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री व एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत महा-मेट्रो आणि एमएसआरटीसी यांच्यात स्वाक्षरी करण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे प्रत्यक्ष उपस्थित होते. या अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे टेंडर पुढील महिन्यात काढण्यात येत असून  तीन ते चार वर्षांत बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “महामेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम सुलभ व्हावे म्हणून शिवाजीनगर येथील मूळ एसटी बसस्थानकाचे स्थलांतर २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे करण्यात आले होते. मेट्रो सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर बसस्थानक पुन्हा शिवाजीनगर येथील मूळ जागेवर आणण्यासाठी मी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होतो. परिवहन विभाग, एसटी महामंडळ आणि शासन स्तरावर अनेक बैठका घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा  पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला, आणि अखेर आज या प्रयत्नांना यश आले आहे.”

या प्रस्तावित मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पासाठी सुमारे ८२५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.  राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाचा विकास पीपीपी (PPP) मॉडेलद्वारे करण्याच्या धोरणात्मक निर्णयाला मान्यता दिली आहे. महा-मेट्रो या प्रकल्पाची ‘प्रकल्प अंमलबजावणी संस्था’ (Project Implementing Authority – PIA) म्हणून काम करेल आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून हा विकास साधला जाईल.

नवीन स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक प्रतीक्षागृह, बसगाड्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र वर्कशॉप आणि पार्किंगची विशेष व्यवस्था असणार आहे. तळमजल्यावर प्रवासी स्थानक, पहिल्या मजल्यावर बस पार्किंग आणि त्यावरील मजले पीपीपी तत्त्वावर व्यापारी उपयोगासाठी विकसित केले जातील.

शिवाजीनगर हे आगामी काळात पुण्यातील सर्वांत मोठे एकात्मिक वाहतूक केंद्र  म्हणून विकसित होणार आहे. येथे मेट्रोचे दोन मार्ग, शिवाजीनगर रेल्वेस्थानक, जवळच असलेली पुणे व खडकी मुख्य रेल्वेस्थानके, जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील मेट्रो इंटरचेंज यामुळे या बसस्थानकाला अत्यंत मोक्याचे स्थान प्राप्त होणार आहे आणि एकात्मिक वाहतूक केंद्र (Transport Hub) म्हणून उदयास येणार आहे.

सध्या आरे डेअरीच्या जागेवर महा-मेट्रोद्वारे तात्पुरत्या स्वरूपात चालवले जाणारे वाकडेवाडी येथील एमएसआरटीसी बस स्थानक, शिवाजीनगर येथील नवीन बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी हलवले जाईल. यासोबतच पीएमपीएल (PMPML) बससेवा आणि रिक्षा प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्गिका व थांबे उभारले जातील. खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार असून, रोज १ लाखापेक्षा जास्त प्रवाशांना याचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

रक्तदानाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नगरसेवक निलेश कोंढाळकर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड येथील उत्सव सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक निलेश कोंढाळकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या सेवाभावी उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. या शिबिरामध्ये 312  रक्तदात्यांकडून रक्तदान करीत शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी मुरलीधर मोहोळ हे स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले आणि त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण सेवाभावी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नगरसेवक निलेश कोंढाळकर म्हणाले, मुरलीधरअण्णांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान महासंकल्प दिनासारखे उपक्रम आयोजित केले जातात. यामुळे पुण्यातील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यास मदत होते आणि समाजात सेवाभावाची भावना दृढ होते. कोथरूड भागातील या शिबिरात स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .रक्तदात्यांनी केवळ शुभेच्छाच नव्हे तर प्रत्यक्ष रक्तदान देऊन अण्णांच्या वाढदिवसाला मोठे सामाजिक योगदान दिले आहे. पुणेकरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या शिबिराला त्रिमूर्ती मित्र मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ (दोस्ती ग्रुप), अखिल सागर कॉलनी मित्र मंडळ, राजा शिवराय मित्र मंडळ (विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ), गजानन मित्र मंडळ आणि हिंदुत्व मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि जनसेवा ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध मित्र मंडळांच्या सक्रिय सहभागामुळे शिबिराची व्यवस्था सुरळीत पार पडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित राहिले.

नगरसेवक निलेश कोंढाळकर आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकारामुळे तसेच सहभागी सर्व मित्र मंडळांच्या सहकार्यामुळे हे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी झाले. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकतेची आणि मानवतेची भावना मजबूत होते,

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार पुणे राष्ट्रीय एकता दौड’चा ‘फ्लॅगऑफ’१५ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

नशामुक्त भारतासाठी धावणार पुणे

आंतरराष्ट्रीय धावपटूंसह ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

पुणे: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून पुण्यात रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’ला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात केनियासह आफ्रिकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह देशभरातील नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि ‘नशामुक्त भारत’ हा व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या भव्य मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागी होणार आहेत.

देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने यंदाच्या आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून ३१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच राष्ट्रीय भावनेतून पुण्यात आयोजित होणारी ही मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा नसून एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा व्यापक संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव ठरणार आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीने पुणे राष्ट्रीय एकता दौडला विशेष महत्त्व

देशाची एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या भव्य मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या उपक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरणार आहे. हजारो पुणेकरांच्या सहभागातून ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चा संदेश देणाऱ्या या आयोजनाला राष्ट्रीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

केनियासह आफ्रीकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये केनियासह इतर आफ्रीकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह भारतातील नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या आफ्रीकन देशातील धावपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय धावपटूंच्या सहभागातून पुण्याच्या क्रीडा संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळणार असून स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार आहे.

पाच विविध गटांत स्पर्धा; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’मध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. अनुभवी आणि व्यावसायिक धावपटूंबरोबरच विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. विविध स्पर्धात्मक गटांतील विजेत्यांसाठी एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी २५ हजारांचा सहभाग; यंदा ४० हजारांचा टप्पा गाठला जाणार !

गेल्या वर्षी आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी २०२५’ला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १० हजारांहून अधिक स्पर्धात्मक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता. केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

यंदाच्या उपक्रमासाठी ४० हजारांहून अधिक नागरिक  सहभागी होणार आहेत. शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, युवक-युवती आणि सर्वसामान्य पुणेकरांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

‘नशामुक्त युवा-विकसित भारत’चा विशेष संदेश

यंदाच्या पुणे राष्ट्रीय एकता दौडचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘नशामुक्त युवा-विकसित भारत’ ही संकल्पना. तरुणाईमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करून क्रीडा, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

‘नशामुक्त युवा-सशक्त युवा-विकसित भारत’ या विचारातून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवत त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास, आरोग्याविषयी जागरूकता आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निरोगी युवा पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद असून या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक; विविध संस्थांचे सहकार्य

या भव्य उपक्रमासाठी बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक म्हणून सहभागी झाला आहे. पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस यांच्यासह अमूल, मदर डेअरी, महामेट्रो पुणे, ग्लोबल जीएचए अँड स्कूल ऑफ एव्हिएशन, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चितळे बंधू, विक्रम गायकवाड ग्रुप, मदर डेअरी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बिग एफएम ९५, फ्लाय९१, झेंडू, ग्लुकॉन-डी आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या विविध संस्था व ब्रँड्सचे सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीने पुण्याच्या राष्ट्रीय एकता दौडला नवी उंची : मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक, पुणे रन फॉर युनिटी २०२६ मुरलीधर मोहोळ म्हणाले, “लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ या भव्य उपक्रमाला देशाचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ होणार आहे, ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून पुण्याची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केनियातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह देशभरातील नामांकित धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेषतः युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून क्रीडा, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा यंदाच्या आयोजनामागील महत्त्वाचा विचार आहे.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना लोकसहभागातून बळ देण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या वर्षी २५ हजारांहून अधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यंदा ४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून राष्ट्रीय एकात्मतेचा हा संदेश आणखी व्यापक होईल, असा विश्वास आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमात पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

पुणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार, १५ नोव्हेंबर रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणाऱ्या या भव्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी विनामूल्य आहे. या मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

विनामूल्य नोंदणीसाठी संकेतस्थळ : www.runbuddies.club/puneunityrun

यंदा पुणे शहरात बालचिमुकल्यांना दिवाळीत किल्ले साकारण्यासाठी मातीच उपलब्ध नाही!
बालचिमुकल्यांच्या शिवकालीन किल्ले बनविण्याच्या परंपरेवर मातीअभावी संकट; महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.- मनविसेचे प्रमुख राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांची मागणी

पुणे : दिवाळी म्हटले की लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकर्षण असते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले साकारण्याचे. मात्र यंदा पुणे शहरातील अनेक भागांमध्ये दिवाळीनिमित्त किल्ले बनविण्यासाठी माती मिळत नसल्याची समस्या नागरिक आणि पालकांकडून समोर येत आहे.

एकीकडे आपण नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशांत कनोजिया म्हणाले, इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो; तर दुसरीकडे या परंपरेसाठी आवश्यक असलेली मातीच उपलब्ध होत नसेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.पुणे महानगरपालिकेने याकडे केवळ माती विक्रीचा प्रश्न म्हणून न पाहता सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडलेला विषय म्हणून पाहावे.

प्रमुख मागण्या :

1. पुणे शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत किल्ल्यांसाठी माती उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत केंद्र सुरू करावे.

2. पर्यावरणाला हानी न पोहोचवता बांधकामातील स्वच्छ अतिरिक्त माती संकलित करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावी.

3. शाळा, मंडळे आणि बालगोपाळांसाठी माती मोफत किंवा माफक दरात उपलब्ध करून द्यावी.

4. दिवाळीपूर्वी माती वितरणाचे नियोजन करून त्याची माहिती महापालिकेने प्रसिद्ध करावी.

प्रशासनाला सवाल :

पुणे शहरात मोठमोठे विकासप्रकल्प आणि बांधकामे सुरू असताना मुलांना शिवरायांचे किल्ले बनवण्यासाठी मूठभर माती मिळू नये, ही दुर्दैवी बाब नाही का? असा सवाल प्रशांत कनोजिया यांनी उपस्थित केला आहे.मुलांच्या हातातील माती हिरावून घेऊ नका; कारण याच मातीतून उद्याच्या पिढीमध्ये शिवरायांचा इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा रुजते! असेही कनोजिया म्हणाले.

एसएनडीटी मेट्रो स्टेशनलगतची सिंचन विभागाची जागा तातडीने ताब्यात घेऊन मेट्रो पार्किंगसाठी विकसित करा – पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी
पुणे : कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिंचन विभागाच्या मालकीची विनावापर पडून असलेली जागा मेट्रो प्रवाशांच्या पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी. यासाठी पुणे महानगरपालिकेने संबंधित विभागाशी तातडीने समन्वय साधून जागा भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि पार्किंग विकसित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी ठोस मागणी नगरसेवक तथा भाजप पुणे शहराचे महामंत्री पुनीत श्रीकांत जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नगरसेवक पुनीत जोशी म्हणाले, एसएनडीटी मेट्रो स्टेशन परिसरात अधिकृत पार्किंगची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मेट्रो प्रवासी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, कोंडी निर्माण होते आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. उपलब्ध जागेचा योग्य वापर न झाल्याने एका बाजूला जागा विनावापर पडून आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्किंगअभावी वाहतुकीची समस्या तीव्र होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

महापालिका प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन संबंधित विभागांशी समन्वय साधावा आणि प्रत्यक्ष पार्किंग सुविधा सुरू होईपर्यंतची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी, अशी मागणी पुनीत जोशी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ‘आयआयएम मुंबई’ करणार सर्वंकष अभ्यास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराला सकारात्मक प्रतिसाद
विविध विभागातील तज्ज्ञांची प्राथमिक बैठक

पुणे : पुणे शहर आणि महानगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आता भारतीय प्रबंधन संस्थान, मुंबई (आयआयएम) या नामांकित संस्थेची मदत घेतली जाणार आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून शहरातील वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण सुविधांचा सर्वंकष अभ्यास करण्यास संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात संस्थेच्या तज्ज्ञांची पुण्यात विविध विभागातील अधिकाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली असून, वाहतूक समस्यांवर शास्त्रीय पद्धतीने दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

पुणे शहर आणि महानगर परिसरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी २८ सप्टेंबर रोजी आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांना पत्र पाठविले होते. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा स्वतंत्र प्रकल्पांपुरता विचार न करता संपूर्ण महानगर क्षेत्राची एकात्मिक वाहतूक व्यवस्था म्हणून अभ्यास करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्याला आयआयएम मुंबई या संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला.

या पत्रानुसार आयआयएम मुंबईच्या प्राध्यापक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांची आज प्राथमिक बैठक झाली. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पुणे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, वाहतुक नियोजक निखिल मिजार, आयआयएमच्या वतीने ले. कमांडर (नि.) निशा सिंग, प्रा. राकेश राऊत, प्रा. रवींद्र गोखले, प्रा. रोझी मित्रा यांच्यासह महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, एनएचएआय, आरटीओ, एमएसआयडीसी, पीएमपीएमएल यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतुकीच्या समस्यांचे स्वरूप, अभ्यासाची व्याप्ती आणि पुढील कार्यवाहीची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे महानगर परिसराची लोकसंख्या सुमारे एक कोटी असून, आगामी तीन दशकांत ती दोन कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २०१८ मधील ५२ लाखांवरून २०२६ मध्ये ८१ लाखांपर्यंत वाढली आहे. दररोज एक हजार ३०० हून अधिक वाहनांची भर पडत असल्याने रस्त्यांवरील ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि एकात्मिक वाहतूक नियोजनाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले असून, या अनुषंगाने हा शास्त्रीय अभ्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असे मा. मुरलीधर मोहोळ यांनी निदर्शनास आणून दिले.

शहरातील प्रमुख रस्ते, वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, सिग्नल यंत्रणा, सार्वजनिक वाहतूक, मेट्रोचे जाळे आणि प्रस्तावित रिंगरोड यांचा एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. सध्या वाहतूक पोलिस, महापालिका आणि अन्य यंत्रणांकडून सिग्नल समन्वय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहतुकीचे विश्लेषण आणि प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, वाढत्या वाहनसंख्येचा विचार करता दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

आयआयएम मुंबई ऑपरेशन्स रिसर्च, वाहतूक व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांत देशात एक अग्रणी संस्था आहे. यातील तज्ज्ञांच्या सहकार्याने पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर आणि भविष्यातील गरजा लक्षात घेत उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

या अभ्यासासाठी पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल), प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधण्याची अपेक्षा आहे. अभ्यासातून प्राप्त होणाऱ्या शिफारशींच्या आधारे संबंधित यंत्रणांना पुढील उपाययोजना राबविता येणार आहेत.

वाहतूक नियोजनासाठी एकात्मिक दृष्टिकोन

पुणे शहरासह संपूर्ण महानगर परिसरातील वाहतुकीचा अभ्यास

वाहतूक कोंडीची कारणे आणि प्रमुख रस्त्यांवरील समस्यांचे विश्लेषण

सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापनातील सुधारणांचा विचार

मेट्रो, पीएमपीएमएल आणि अन्य वाहतूक सुविधांचा समन्वय

वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना

‘केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुण्याची वाहतूक कोंडी ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर समस्या आहे. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी आयआयएम मुंबईसारख्या नामांकित संस्थेच्या तज्ज्ञतेचा उपयोग व्हावा, या उद्देशाने पुढाकार घेतला. संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्राथमिक चर्चेलाही सुरुवात झाली आहे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार…
पुणे : जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या स्टेज २ पर्वती HLR झोन, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.), चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, पाषाण व सुस गोल टाकी परिसर, चतुः श्रृंगी टाकी परीसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र अंतर्गत येणारा परिसर, वडगाव जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील (गुरूवार दिनांक १०/०९/२०२६ रोजी) बुधवार रात्री १२:०० पासून गुरुवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच शुक्रवार दिनांक ११/०९/२०२६ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

पर्वती HLR टाकी परिसर सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरकाही भाग, महर्षीनगर,गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण,भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं.४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर, जनता वसाहत इत्यादी.

भामा आसखेड:-
लोहगाव, कळस धानोरी, टिंगरे नगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर इत्यादी

एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.): गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेररोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोनिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकरपॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजे वार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा, स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, इत्यादी.

चांदणी चौक टाकी परिसर:- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..

गांधी भवन टाकी परिसरः कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला

फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा,पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर, इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसरः कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

पाषाण व सुस गोल टाकी परिसर– गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, सम्म कॉलनी काही भाग इत्यादी.

चतुः श्रृंगी टाकी परीसर औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.

जुने वारजे जलकेंद्र भागः रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमरभारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

लष्कर पाणी पुरवठा अंतर्गत बेकर हिल टाकीवरून पाणी पुरवठा होणारा भाग पुढील प्रमाणे -लुल्ला नगर, कोंढवा गावठाण, भाग्योदय नगर, मिठा नगर, कौसर बाग, एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार परिसर, वानवडी बेकर हिल टाकीवरील भाग (आझादनगर, केदारीनगर, गंगा सॅटॅलाइट सोसायटी परिसर, शिंदे छत्री परिसर, जगताप चौक परिसर, जांभूळकर चौक ते शिवानंद गार्डन व त्याखालील तात्या टोपे सोसायटी, परमारनगर पर्यंतचा भाग) इत्यादी.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भागः- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

न्युकोपरे. कोंढवे – धावडे जलकेंद्र: वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे,

वडगाव जलकेंद्र परीसर :-

दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीकुंज, रेलीकॉन, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, दत्तनगर चौक, संतोषनगर व अंजलीनगर परिसर, आगम मंदिर परिसर, गुरूद्वारा इत्यादी परिसर. कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभोनगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, लक्ष्मीनगर परिसर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीनपार्क, साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरूदत्त सोसायटी, पुण्याई नगर, सिंहगड रस्ता परिसर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकर नगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी काही भाग., सच्चाई माता टाकी, सुंदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, वरखडे नगर तसेच संपूर्ण येवलेवाडी परिसर इ.

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाच्या वतीने मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन…
उपक्रम आठवड्यात २ दिवस असे पुढील २ महिने चालणार आहे.

पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे करण्यात आले होते.

हा उपक्रम  मंडळा मार्फत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि  माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील इयत्ता ८ वी, ९ वी च्या विद्यार्थ्यासाठी राबवला जात असून यात प्रत्येक शाळेतील ५० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

सदर उपक्रमाचे उद्घाटन आज पार पडले. या कार्यक्रमाला रमणबाग शाळाप्रमुख श्रीमती आशा माने या अध्यक्ष स्थानी होत्या तसेच न्यू इंग्लिश टिळक रोड शाळाप्रमुख राव मॅडम आणि माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या शाळाप्रमुख बनकर मॅडम उपस्थित होत्या.मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार मंडळाचे अध्यक्ष मंगेश राव यांनी केले

माधव जगताप, उपयुक्त पुणे महानगर पालिका हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मोडी लिपी आणि शिवाजी महाराज यासंदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर दुसरे पाहुणे मोडी लिपी तज्ञ राजेंद्र ढुमे यांनी विद्यार्थ्यांना मोडी लिपीचा इतिहास, त्याचे महत्व समजून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे  योगेंद्र भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य साठे यांनी केले. या ३ ही शाळेत हा उपक्रम आठवड्यात २ दिवस असे पुढील २ महिने चालणार आहे, याचबरोबर विविध मान्यवरांची व्याख्याने आणि वारसा सहल विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणार आहे.

अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेचे मोडी ही एक वेगळी लिपी आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्व खूप आहे, आपला मराठ्यांच्या इतिहास हा या मोडी लिपीतच लिहिला गेलेल्या पत्रसंग्रहातून उलगडला गेला आहे त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना या लिपीचा परिचय व्हावा, त्यांना इतिहासात रस निर्माण व्हावा आणि आपल्या इतिहासाचा सखोल अभ्यास व्हावा असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अजिंक्य साठे यांनी नमूद केले.