#punerunforunity – Sinhasan News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार पुणे राष्ट्रीय एकता दौड’चा ‘फ्लॅगऑफ’१५ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

नशामुक्त भारतासाठी धावणार पुणे

आंतरराष्ट्रीय धावपटूंसह ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

पुणे: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून पुण्यात रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘पुणे राष्ट्रीय एकता दौड’ला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात केनियासह आफ्रिकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह देशभरातील नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक तंदुरुस्ती आणि ‘नशामुक्त भारत’ हा व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या भव्य मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागी होणार आहेत.

देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याने यंदाच्या आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून ३१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच राष्ट्रीय भावनेतून पुण्यात आयोजित होणारी ही मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा नसून एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा व्यापक संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव ठरणार आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीने पुणे राष्ट्रीय एकता दौडला विशेष महत्त्व

देशाची एकात्मता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या भव्य मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या उपक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरणार आहे. हजारो पुणेकरांच्या सहभागातून ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चा संदेश देणाऱ्या या आयोजनाला राष्ट्रीय पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

केनियासह आफ्रीकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये केनियासह इतर आफ्रीकन देशातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह भारतातील नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविणाऱ्या आफ्रीकन देशातील धावपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेची रंगत वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय धावपटूंच्या सहभागातून पुण्याच्या क्रीडा संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळणार असून स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार आहे.

पाच विविध गटांत स्पर्धा; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’मध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. अनुभवी आणि व्यावसायिक धावपटूंबरोबरच विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीयांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. विविध स्पर्धात्मक गटांतील विजेत्यांसाठी एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी २५ हजारांचा सहभाग; यंदा ४० हजारांचा टप्पा गाठला जाणार !

गेल्या वर्षी आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी २०२५’ला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १० हजारांहून अधिक स्पर्धात्मक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता. केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

यंदाच्या उपक्रमासाठी ४० हजारांहून अधिक नागरिक  सहभागी होणार आहेत. शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, युवक-युवती आणि सर्वसामान्य पुणेकरांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

‘नशामुक्त युवा-विकसित भारत’चा विशेष संदेश

यंदाच्या पुणे राष्ट्रीय एकता दौडचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘नशामुक्त युवा-विकसित भारत’ ही संकल्पना. तरुणाईमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करून क्रीडा, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

‘नशामुक्त युवा-सशक्त युवा-विकसित भारत’ या विचारातून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवत त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास, आरोग्याविषयी जागरूकता आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निरोगी युवा पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद असून या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक; विविध संस्थांचे सहकार्य

या भव्य उपक्रमासाठी बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक म्हणून सहभागी झाला आहे. पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस यांच्यासह अमूल, मदर डेअरी, महामेट्रो पुणे, ग्लोबल जीएचए अँड स्कूल ऑफ एव्हिएशन, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चितळे बंधू, विक्रम गायकवाड ग्रुप, मदर डेअरी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बिग एफएम ९५, फ्लाय९१, झेंडू, ग्लुकॉन-डी आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या विविध संस्था व ब्रँड्सचे सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे.

अमित शाह यांच्या उपस्थितीने पुण्याच्या राष्ट्रीय एकता दौडला नवी उंची : मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक, पुणे रन फॉर युनिटी २०२६ मुरलीधर मोहोळ म्हणाले, “लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ या भव्य उपक्रमाला देशाचे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या शुभहस्ते मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ होणार आहे, ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून पुण्याची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केनियातील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह देशभरातील नामांकित धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेषतः युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून क्रीडा, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा यंदाच्या आयोजनामागील महत्त्वाचा विचार आहे.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना लोकसहभागातून बळ देण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या वर्षी २५ हजारांहून अधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. यंदा ४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून राष्ट्रीय एकात्मतेचा हा संदेश आणखी व्यापक होईल, असा विश्वास आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमात पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

पुणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार, १५ नोव्हेंबर रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणाऱ्या या भव्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी विनामूल्य आहे. या मॅरेथॉनमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

विनामूल्य नोंदणीसाठी संकेतस्थळ : www.runbuddies.club/puneunityrun