#uddhavthackeray – Sinhasan News

दिल्ली उच्च न्यायालयाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना समन्स ; प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली : राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली हायकोर्टानं संजय राऊत ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे.कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत.

शिवसेनेचे आमदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या-ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्या-त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

याच मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं आज याचिका दाखल करुन घेतली आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे. तसेच, कोर्टानं तिघांनाही याप्रकरणी स्वतः वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून या आरोपांसंदर्भात स्वतःची बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

शिवसेना कोणाची ? ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर मोठा दावा
शिवसेना पक्ष कोणाचा, पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे.या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ठाकरे गटाने आज लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर केले. कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची असल्याचा दावा ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला 20 जून 2022 पासूनच्या घटनाक्रमांची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावर केलेला दावा हा चुकीचा असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले.

पक्ष म्हणजे आमदार-खासदारांचा नसतो. तर पक्ष हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा असतो. आम्ही त्याचे पुरावे दिले आहेत. जवळपास तीन लाख पदाधिकारी आणि 20 लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली असल्याचे शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी सांगितले. आमची बाजू उजवी आणि सत्यावर आधारीत असल्याने आमच्या बाजूने निकाल लागेल असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, आमदार-खासदारांना मिळालेली मते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मिळाली आहेत. ही मते उमेदवारांच्या नावावर मिळाली नाहीत, असेही त्यांनी म्हटले. उद्या, विधानसभेत एकच संख्याबळ असलेल्या पक्षाच्या आमदाराने पक्षांतर केले तर, त्याच्यासोबत संपूर्ण पक्ष गेला, असे म्हणणार का, असा प्रश्नही खासदार सावंत यांनी केला.

शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी उत्तर दाखल

निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात हजर राहत शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर दावा केला. एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद हे घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे अधिक आहे. निवडणूक चिन्ह देताना संख्याबळ विचारात घेतलं जावं असा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला.

दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रं आयोगासमोर सादर

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज होणारी सुनावणी लांबणीवर, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपस्थित नसल्यानं सुनावणी तहकूब
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात आज न्यायालयात सुनावणी होणार होती. या पाच न्यायमूर्तींपैकी आज न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नाहीत. त्यामुळं आजची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता राज्यातील सत्तासंघर्षावर पुढची सुनावणी कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर आज होणारी सुनावणी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ही सुनावणी लांबणीवर गेल्यानं याबाबत कधी निर्णय लागणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राज्यातील सत्ता संघर्षाची मागील सुनावणी एक नोव्हेंबरला झाली होती. यामध्ये ही सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली होती. त्यानंतर याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आता ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याआधी दोन्ही बाजूने एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावे असे घटनापीठाने म्हटले होते. तसेच दोन्ही बाजूने कोणत्या मुद्यावर कोणते वकील युक्तिवाद करतील हे देखील निश्चित करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाही. लिखित स्वरुपात मुद्दे दिल्याने घटनापीठाला सुनावणी घेण्यास आणि निकाल लिहिण्यास मदत होते, असेही कोर्टाने म्हटले.

उध्दव ठाकरेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश
नवी दिल्ली : पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाचा निर्णय तातडीनं घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे.

धनुष्यबाणासाठी उद्धव ठाकरे गटानं दिल्लीतील हायकोर्टात धाव घेतली होती. पण आज कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. हा त्यांना मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पोट निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव गोठवलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तात्पुरतं दिलं होतं. पण ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णायाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे, त्याशिवाय पक्षचिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गट यापुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाचा अधिकार मान्य करत दिल्ली हायकोर्टानं शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्याशिवाय चिन्हाचा अंतिम निर्णय तातडीने घ्यावा, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टानं दिले आहेत. पक्षचिन्हाच्या निर्णायाचे अधिकार हे निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामध्ये कोर्ट पडत नाही. त्यामुळेच पक्षचिन्हाचा अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण गोठवलेलंच असेल.

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवा वरील केलेल्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावरील वक्तव्याचे पुण्यातही पडसाद उमटले दिसत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्राचे पुण्यात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. पुण्यात शिंदे गटाच्या युवा सेनेकडून बालगंधर्व चौकात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.

पत्राच्या मजकूराचा होर्डिंग्जमध्ये असलेला उल्लेख खालीलप्रमाणे

माननीय श्री. उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
काल विजयादशमी झाली. या नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस सारा महाराष्ट्र आदिशक्तीचा जागर करीत होता. तिच्या शक्ती आणि भक्तीचे पोवाडे गात होता आणि तिच्याकडेच आशीर्वादही मागत होता. कालचा दिवस म्हणजे नऊ दिवसांच्या आनंदाच्या माळेनंतरची सोन्याची माळ. हा दिवस सत्याचा असत्यावर विजय मिळवण्याचा आणि आनंद लुटण्याचा. मात्र काल उभ्या महाराष्ट्रानं काय पाहिलं? काय ऐकलं?

महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं आज तुम्हाला हे पत्र लिहीत आहे. हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ‘खासदार मुला’चं नाही; हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस, चिमुकल्याच्या ‘बापा’चं. माझं हे पत्र तुम्ही नीट, सहृदयतेनं पूर्णपणे वाचावं, अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती.

काल आमचा – शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात दणक्यात झाला. तुम्हीही तुमचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेतलात. आपापल्या राजकीय भूमिका मांडणं, प्रतिस्पर्ध्यावर टीका करणं हे राजकारणात होणारच. त्यावर माझा आक्षेप नाहीच. तुम्ही तुमच्या मेळाव्याची जाहिरात काय केली होतीत? धगधगत्या हिंदुत्वाचे विचार ऐका वगैरे. कालच्या सभेत तुम्ही हिंदुत्वाचे काय विचार ऐकवलेत ते फक्त तुम्हालाच ठाऊक. मला तुम्हाला फक्त इतकंच विचारायचं आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?

उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा – रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही ‘कार्टं’ असा केलात. चला, ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही. पण तुम्ही हद्दच केलीच. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असं वक्तव्य केलंत तुम्ही. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो? उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही.

उद्धवजी, माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मी खासदार आहे; पण आम्ही शेवटी रक्तामांसाची, भावभावना असलेली माणसंच आहोत हो. तुम्हाला कल्पना आहे का, कालच्या तुमच्या वक्तव्यानं आमच्या कुटुंबातील लोकांना किती धक्का बसला आहे तो? खरं तर हे खूपच खासगी पातळीवरचं आहे, पण ते सांगणं मला भाग पडत आहे. तुम्ही काल जे बोललात ते ऐकून बाळाची आई व आजी दोघी कमालीच्या दुखावल्या. धास्तावल्यात. डोळ्यांत अश्रू दाटून आले त्यांच्या…..

ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं-खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे नि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे?

एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही असली भाषा? अहो, पद वगैरे जाऊ द्या. कुठलाही सुसंस्कृत माणूस, संवेदनशील माणूस असं बोलू शकतो? बोलणं सोडाच, असा विचार करू शकतो? मनाला किती वेदना देणारं आहे हे उद्धवजी. आणि या पत्रात जी वेदना मी मांडली आहे तीच भावना राज्यातील प्रत्येक बापाची असणार यात मला तरी शंका नाही.

ज्या परिवारासाठी आम्ही जीवाचं रान केलं. त्याच कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती ज़र आमच्या चिमुकल्याबद्दल असे उद्गार काढत असेल तर आमच्या मनाला किती वेदना होत असतील…

तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही नि सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो. उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल. तुमच्या लाडक्या नातवाचं, नातीचं कौतुक कराल. त्यांच्या डोळ्यांतील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची नि तुमच्या कुटुंबीयांची. देव करो नि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी- एका बापाची – मनापासूनची सदिच्छा आहे.

एकच लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जिवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यांत धारधार असतो, आणि बाळासाठी वाट्टेल ते करणाऱ्या हिरकणीचा हा महाराष्ट्र आहे. त्या हिरकणीचा अंश अजूनही सगळीकडे आहे.
भगवद्गीतेत एक श्लोक आहे…

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
हा श्लोक तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल अशी आशा करतो. हा श्लोक वाचून एक प्रश्न मनात येतो तो तुम्हाला विचारतो. माझ्या बाळाचा जन्म आणि हा श्लोक यांत काही नातं असेल का हो?

उद्धवजी, काळ लक्षात घ्या, श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. वेळ निघून चालली आहे. वेळेसोबतच बरच काही निघून चाललंय तुमच्या हातातून. त्याचा विचार करा!!

असो…

पत्राच्या शेवटी एका बापाची हात जोडून, डोळ्यांत पाणी आणून विनंती. राजकारण होतच राहील हो… टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा.

कळावे.

-डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
एक दुखावलेला बाप

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या निर्णय?; चार याचिकांवर होणार सुनावणी
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून   फैसला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्ता संघर्षावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकतं, असं जाणकार सांगतात. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय कोर्टाकडून येणारा निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालावर शिवसेनेचं अस्तित्वही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरही उद्याच सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? की कोर्ट काही आदेश देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.

1. एकून 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान
2 . राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान
3. शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप
4. एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, मला तुमची काळजी वाटतीय.. मुख्यमंत्र्यांचे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला. या सर्वांना आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व बंडखोर आमदारांना वारंवार आवाहन केलं जात आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल.”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेनं जो मान सन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.”, अशी भावनिक सादही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व बंडखोर आमदारांना घातली आहे.

‘धर्मवीर’ चित्रपट अर्धवट सोडून अचानकच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडले
मुंबई : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’  या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा प्रवास पडद्यावर उभा केला आहे. अलिकडेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. त्यांनी पत्नीसह चित्रपट पाहिला. चित्रपटातील आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं.

चित्रपटात आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या सीन आधी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं. चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आनंद दिघे, त्यांची सिंघनिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहेत.

मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात, हा चित्रपटातील प्रसंग संपतातच उद्धव ठाकरे चित्रपटगृहातून बाहेर पडले. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता.’

प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली ही विनंती
पुणे : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकविनंती केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

प्राजक्ता माळीने काय म्हटलंय?

“नमस्कार, नुकतंच आमच्या पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. १८ फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण आता सरकारलाच विनंती आहे की, करोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असे का?”

“त्यामुळे आम्हा सर्वांची अशी नम्र विनंती आहे की शिवजयंती तोंडावर आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, चित्रपट निर्मात्यांना, सर्व रंगकर्मींना १०० टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल. आम्ही आशा करतोय की १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल. ही सरकारला नम्र विनंती. त्यासोबत प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा, ही विनंती.”

या व्हिडीओद्वारे तिने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करा, यासाठी कळकळीची विनंती केल्याचे दिसून येते.