#VijayChougule – Sinhasan News

बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यावर भर : विजय चौगुले
कोल्हापुरात वडार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा घेणार; सोलापुरात स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारणार

पुणे : वडार समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती अपेक्षित गतीने झालेली नाही. त्यामुळे समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच समाजातील तरुणांच्या बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. वडार समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून संघटित ताकद निर्माण केल्यास समाजाला न्याय आणि विकासाच्या संधी मिळवून देता येतील, असे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांनी केले.

वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिरात आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेविका शारदा ओरसे, डॉ. कल्पना शिंदे, प्रदीप पवार, दिलीप कुसाळे, संतोष मोहिते, साहेबराव साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौगुले म्हणाले, वडार समाजाचा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी कायम आहे. समाजाच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पुण्यात संकल्प मेळावा घेण्यात आला. यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यश आले. त्याच धर्तीवर कोल्हापूर येथील महामेळाव्यातून समाजाच्या विकासासाठी विविध योजना मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातील लाखो समाजबांधव उपस्थित राहतील.

स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह

वडार समाजातील तरुणांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डिसेंबर-जानेवारीदरम्यान सोलापूर येथे एमपीएससी आणि यूपीएससीच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहही उभारण्यात येणार असून, या उपक्रमांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वडार समाजाचा इतिहास, संस्कृती आणि भाषा यांचे दस्तऐवजीकरण करून समाजाच्या सांस्कृतिक वारशावर आधारित कॉफी टेबल बुकही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.