पुणे शहर
केळेवाडीतील ११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला.कोथरूडमधील दुर्दैवी घटना
कोथरुड : पौड रस्त्यावरील केळेवाडीतून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या लहान मुलाचा मृतदेह रविवारी दुपारी मोरे विद्यालय चौकाजवळील मोकळ्या जागेमध्ये आढळून आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरीक हळहळ व्यक्त करीत आहेत.(the-body-of-an-11-year-old-missing-boy-was-found-in-kelewadi)
विश्वजीत उर्फ विशू वंजारी (वय ११) हा २९ जानेवारीला पौड रस्त्यावरील केळेवाडी मधील राहत्या घरा जवळून बेपत्ता झाला होता. कोथरुड पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस आणि त्याचे पालक तपास घेत असतानाच असा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. कोथरुड पोलिस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.