पुणे शहर

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल ; ११ वीच्या प्रवेशासाठी मुदत वाढवा : दिपाली धुमाळ

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना केंद्रशासनाकडून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतून हजारो विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालय मध्ये प्रवेश घेतलेला आहे, परंतु काही विद्यार्थी वैयक्तिक कारणामुळे अजूनही ऑनलाइन प्रवेश प्रक्रीये पासून वंचित राहिलेले आहेत. मुदत संपल्याने प्रवेश घेता येत नसल्याने वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ११ वीच्या प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी पुणे विभागाच्या
विभागीय शिक्षण उपसंचालक यांना दिले असून
दिलेल्या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशा साठी अर्ज करता आलेला नाही आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही.

Fb img 1647413711531

प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये या करिता ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्याच्या प्रक्रीये मध्ये ८ दिवसाची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे धुमाळ यांनी केली आहे.

Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये