राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मुंबई : शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. या भाषणामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे. तसेच अमित शाहांच्या भेटीत काय घडलं राज ठाकरेंनी भर सभेत सांगितलं आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. तसेच ,महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे अशा शब्दात पक्षफुटीवर हल्लाबोल केला.
2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे.
मोदी पंतप्रधान व्हावे हे मी सर्वात प्रथम मी बोललो. ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्या नाहीत. मी एखाद्या गोष्टीवर टोकाचे प्रेम करतो. विरोध पण टोकाचा करतो. मी महाराष्ट्रावर टोकाचे प्रेम करतो. पाच वर्षात ज्या गोष्टी पटल्या त्याचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी पटत नाही त्याचा टोकाचा विरोध केला. विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध करतो. स्वर्थासाठी कधीच विरोध केला नाही.
डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या डॉक्टर, नर्सला निवडणुकांच्या ड्युटी लावल्या त्यांनी जाऊ नये, त्यांना कोण नोकरीवरून काढतो त्यांना मी बघतो, असा इशारा दिला.








