सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास आजपासून बंदी ; होणार कठोर कारवाई
दिल्ली : देशात आजपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार असल्याचे केंद्राने निर्देश जारी करण्यात आले होते आणि त्यानुसार आजपासून ही बंदी लागू करण्यात आली आहे.
सिंगल यूज प्लास्टिकवर का बंदी घातली गेली? प्लास्टिक आपण एकदाच वापरतो आणि वापरल्यानंतर फेकून देतो त्यांना सिंगल यूज प्लास्टिक म्हटले जाते. पण असे केल्याने याचा विपरीत परीणाम पर्यावरणावर होतो. आणि निसर्ग चक्र बिघडतं यामुळे सरकाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.
या सिंगल यूज प्लास्टिक बंदीमध्ये प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या वस्तूंची यादी जाहीर केली असून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आहेत.प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या), प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, थर्माकोल, प्लास्टिक चमचे, प्लास्टिक चाकू, स्ट्रॉ, ट्रे, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, सिगरेटचं पॅकेट, 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बॅनर, स्टिरर कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद आणि इन्विटेशन कार्ड इत्यादींवर बंदी घालण्यात आली असून १ जुलैनंतर कोणीही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात आहे . असे केल्यास तुरुंगवास आणि दंड आकारला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.
One Comment