कोथरुड

कोथरूडकरांसाठी एकाच ठिकाणी होणार विविध आरोग्य तपासणी ; संस्कृती प्रतिष्ठानचा उपक्रम..

४९९९ रुपया पर्यंतच्या तपासण्या मोफत

कोथरूड : कोथरुड मधील नागरिकांसाठी संस्कृती प्रतिष्ठान व जहांगीर हॉस्पिटल कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने फ्री हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून या कॅम्पमध्ये एकूण रुपये ४९९९ पर्यंतच्या तपासण्या मोफत करून मिळणार आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे संयोजक भाजप पुणे शहर सरचिटणीस व संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव नीलेश कोंढाळकर यांनी सांगितले.

शनिवार दिनांक 30 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते 4 या वेळेत पौड रस्त्यावरील जहांगीर हॉस्पिटल येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरात रँडम ब्लड शुगर (RBS),कम्प्लीट ब्लड काऊंट ( CBC)
डेंटल चेक-अप, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी (Opthal),
ऑल स्पेशालिटी कन्सल्टेशन, बोन डेन्सीटोमेट्री (बी.एम.डी.), ईसीजी, एक्स रे (एसओएस),२ डी इको,
बी.एम. आय. या 4999 किंमतीच्या तपासण्या मोफत करून मिळणार आहेत.

डायबेटिस पॅकेजेस
एचबीए१ सी, डायबेटिक प्रोफाईल
(शुगर फास्टिंग अँड पीपी, युरिया,
क्रिटेनाईन, युरिक अॅसिड), २ डी इको, ऑप्थॅल्म
कन्सल्टेशन या ४५८० च्या टेस्ट केवळ १४९९ रुपयांमध्ये करून मिळणार आहेत

गायनॅकॉलॉजी
पॅप स्मिअर, सीबीसी, टोटल थायरॉईड (TSH, T3, T4)
कन्सल्टेशन या १७४० रुपयांच्या टेस्ट ११९९ मध्ये करून मिळणार आहे.

एचबीए१सी, लिपिड प्रोफाईल, टोटल थायरॉईड (TSH, T3, T4), एस.जी.ओ. टी, एस. जी. पी.टी, युरिन एक्झामिनेशन (रुटिन) या ३२९० रुपयांच्या टेस्ट १४९९ रुपयंमध्ये

ऑर्थोपीडिक
बी १२, डी ३, बीएमडी, एक्स-रे या ३६५० रुपयांच्या टेस्ट १५९९ रुपयांमध्ये करून मिळणार आहेत. तर सिटी स्कॅन, सोनो ग्राफी, 2 डी इको यावर ५० टक्के खास सवलत ठेवण्यात आली आहे.

या शिबिरात तपासणी करून घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. 8888821084 या क्रमंकावर कॉल करून स्लॉट बुक करावा अथवा

https://bit.ly/HealthCampKothrud

वरील लिंकवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन संयोजक निलेश कोंढाळकर यांनी केले आहे.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये