नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नाला यश- बाणेर, पाषाण, सुस परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत

चांदणी चौकातून बालेवाडीकडे येणारी जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची अखेर दुरुस्ती
पुणे : चांदणी चौकातून बालेवाडीकडे येणाऱ्या 1000 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून बालेवाडी, संपूर्ण बाणेर, पाषाण, सुस रोड, सुतारवाडी, पंचवटी आणि विधातेवस्ती परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले.
अमोल बालवडकर म्हणाले, या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीच्या दुरुस्तीचे काम पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अहोरात्र परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले असून, खराब झालेला व्हॉल्व्ह बदलण्यात आला आहे.त्यामुळे आज संध्याकाळपासून संबंधित परिसरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

या कालावधीत नागरिकांनी दाखवलेल्या संयम व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. तसेच दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या पाणीपुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त करतो. नागरिकांनी पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत आवश्यकतेनुसार पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करावा. असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले आहे.



