पुणे शहर

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात नाईट लाईफ जोमात ; कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे प्रकार ?

पुणे : सध्या कोथरूड मधील नळस्टॉप चौकात रात्री ११, १२ वाजल्यानंतर तरुण तरुणींचे जथ्थे दिसत असल्यामुळे पुण्यात कोथरूड मध्ये मुंबईच्या आधी नाईट लाईफ सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र ही नाईट लाईफ कोणाच्या आशीर्वादाने आणि परवानगीने सुरू झाली आहे ? पोलिस प्रशासन एखादी मोठी अनुचित घटना होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कोथरूड मधील नळ स्टॉप चौकातील नाईट लाईफचा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. रात्री ११,१२ वाजल्यानंतर या चौकात नाईट लाईफ सुरू होते आणि ती पहाटे पर्यंत सुरू राहत असल्याचे सध्याचे चित्र आहे. रात्री उशीरा या चौकातील दुकाने खुली होतात, रस्त्यावर पदपथावर, पुलाखाली मोठ्या संख्येने स्टॉल लागतात. मग या स्टॉल व दुकानाभोवती तरुण तरुणींची गर्दी व्हायला सुरुवात होते. सिगारेटचा धूर हवेत सोडत येथे पोटाची भूक भागवली जाते. सिगारेट बरोबर इतर व्यसनांना इथे जोड मिळत असल्याची चर्चा आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण तरुणी याठिकाणी उशीरपर्यंत गोंधळ घालताना दिसतात. उशीर पर्यंत खायला मिळत असल्याने चौकातच तळीरामांचे अड्डे तयार होऊ लागले असून नाईट लाईफ बरोबर ओपन बार सिस्टीम येथे सुरू झाल्याचे बोलले जात आहे. रात्री पोलिसांची गाडी येते पण पाहून दुर्लक्ष केल्यासारखे करून ती निघून जाते असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

या संदर्भात स्थानिक मनसे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. या सुरू असलेल्या प्रकाराबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून याकडे सोयीस्कर दर्लक्ष केले जात आहे. तरुणांना व्यसनांच्या खाईत लोटण्यासाठी या चौकात नाईट लाईफ सुरू झाली आहे असे वाटते. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. याचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासनाने जागे होऊन उपयोग होणार नाही.

मागील महिन्यात याच ठिकाणी रात्रीच्या वेळी एका व्यक्तीवर वार झाल्याची घटना घडली असताना या नाईट लाईफ कडे केले जाणारे दुर्लक्ष बरेच काही सांगून जात आहे. रात्री उशीरा येथील दुकाने व स्टॉल सुरू करून पहाटे पर्यंत सुरू ठेवायला नक्की कोणी परवानगी दिली. रात्री थोडा उशीर झाला तरी हॉटेल्स बंद करण्यासाठी काठ्या आपटत येणारे पोलीस कुठे आहेत ? रात्री १० च्या ठोक्याला नियमावर बोट ठेवत ए आर रहेमानचा शो बंद करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून याकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हा चौक अलंकार व डेक्कन अशा दोन पोलिस स्टेशन मध्ये विभागला गेला आहे. दोन्ही पोलीस स्टेशन कडून होणाऱ्या दुर्लक्षाचा अर्थ काय? पालिका प्रशासनाकडून येथील स्टॉल वर असलेली कृपा दृष्टी कशामुळे असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या संदर्भात अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांना संपर्क करून या प्रकारावर कारवाई का होत नाही असे विचारले असता “कारवाई दिसेल कशी कारण आम्ही त्यांच्यावर केसेस करतो, कोर्टात हजर करतो, दंडात्मक कारवाई करतो. तसेच ही दोन तीन पोलीस स्टेशन ची हद्द आहे. जास्त गर्दी दिसती ती डेक्कन पोलीस स्टेशनची हद्द आहे.” यावर समुद्र हॉटेल च्या समोरच्या बाजूला ही स्टॉल लगतातच की असे विचारले असता ते म्हणाले, समुद्राच्या बाजुला लागतात त्यांच्यावर केसेस केलेल्या आहेत. दररोजचा खटला आहे. रोज दोन हजार दंड कोर्टात भरला जातो.” यावर रोज दंड भरत असला तरी रोज स्टॉल लागतातच की यावर सहाणे म्हणाले, “कायद्याच्या पुढे जाऊन काय करणार, कायदा आहे की पोलिसांनी दंड करावा” यावर त्यांना त्याठिकाणी रात्री गर्दी झाली आणि काही अनुचित प्रकार घडला तर आपण काय करू शकत नाही का असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

या प्रकारात महापालिका प्रशासनाची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी या भागासाठी असणारे महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना संपर्क साधला त्यांनी सांगितले की, या संदर्भात पाहणी करून पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून योग्य ती कारवाई केली जाईल.

Fb img 1683737623349

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये