महापालिकेत सध्या सभागृहनेते, विरोधीपक्षनेते या पदांना खूपच महत्त्व आले आहे. त्यातही सभागृहनेते पदाचे वजन अधिकच वाढलेले आहे.
पुणे महापालिका स्थापन होऊन ७० वर्षे झाली आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, वाहन व्यवहार समिती अध्यक्ष आणि अन्य दोन समित्यांचे अध्यक्ष एवढीच पदे होती. पीएमपीएल ही कंपनी स्वतंत्र झाल्याने वाहन व्यवहार समिती अध्यक्ष (पीएमटी) हे पद संपुष्टात आलं.
साधारणतः १९९० सालानंतर सभागृहनेता आणि विरोधीपक्षनेता अशी दोन पदे तयार केली गेली. सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याला सभागृहनेता पद दिलं जायचं. याचवेळी विरोधी पक्षाच्या गटनेत्याला विरोधीपक्षनेते पद देणे अपेक्षित होतं. या दोन्ही पदांना संवैधानिक मान्यता नव्हती, निकष नव्हते.
विरोधी पक्षनेते पदाबद्दल तर ‘आले महापौरांच्या मना’ अशी स्थिती होती. दत्ता सागरे हे अपक्ष नगरसेवकांच्या गटाचे नेते होते आणि सत्ताधारी पक्षाला त्यांचा पाठिंबा होता. खासदार सुरेश कलमाडी यांचा महापालिकेवर प्रभाव होता. दत्ता सागरे यांना एखादे पद द्यावे अशी कलमाडी यांची इच्छा होती.
ती इच्छा लक्षात घेऊन तत्कालीन महापौरांनी दत्ता सागरे यांची विरोधीपक्षनेते पदी नियुक्ती केली. विरोधीपक्षनेत्याचे दालन, महापालिकेची अलिशान गाडी त्यांना मिळाली. सहा महिने ते त्या पदावर होते. सत्ताधारी असूनही सागरे विरोधीपक्षनेते झाले. २००३ नंतर मात्र सभागृहनेते आणि विरोधीपक्षनेते ही दोन पदे संवैधानिक झाली, त्यांचे निकष ठरले.
राजेंद्र पंढरपुरे,
ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक.
सिंहासन NEWS- एका क्षणात निर्णय अन् कोथरुडच्या कचरा डेपोचा प्रश्न निकाली.. https://www.sinhasannews.com/in-a-moment-the-decision-solved-the-question-of-the-garbage-depot-of-kothrud-9186/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/
सिंहासन NEWS– गणपुलेंसाठी शरद पवारांची पदयात्रा https://www.sinhasannews.com/sharad-pawars-walk-for-ganapule-8848/
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– बायको नगरसेविका रुबाब पतिराजांचा आणि महापौरांचे दालनातून पलायन… https://www.sinhasannews.com/wife-corporator-rubab-patirajs-escape-from-the-mayors-hall-8583/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS- भाजपच्या बालेकिल्ल्यातील मंत्री बंधू https://www.sinhasannews.com/tales-from-pune-9620/
One Comment