पुणे महापालिका भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे जाहीर, निलेश कोंढाळकर यांच्यासह सात जणांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तर काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याची निवड
पुणे : पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सात सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजप कडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निलेश कोंढाळकर, प्रियांका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित, उदय लेले या नावांची घोषणा केली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि राकेश कामठे हि दोन नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने एका जागेसाठी सुनील शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर तिकिटाच्या स्पर्धेत मागे पडलेल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. आज अखेर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे जाहीर केली आहेत.






