पुणे शहर

बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर यांना अभिनवरत्न पुरस्कार प्रदान..

उर्मिला देव यांचा अभिनव कृतज्ञता शिक्षक पुरस्काराने सन्मान..

पुणे : अभिनव विद्यालय माजी विद्यार्थी व शिक्षेकेतर संघ यांच्या वतीने देण्यात येणारा अभिनवरत्न पुरस्कार बढेकर ग्रुपचे अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी प्रवीण बढेकर यांना तर अभिनव कृतज्ञता शिक्षक पुरस्कार माजी शिक्षिका उर्मिला देव व अभिनव कृतज्ञता सेवक पुरस्कार कृष्णा घुमरे यांना आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. Abhinavaratna award presented to Pravin Badhekar ..

अभिनवरत्न व कृतज्ञता पुरस्कार वितरण’ सोहळा मनोहर मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष पितांबर पाटील, कार्यवाह कुलदीप सावळेकर, कार्याध्यक्ष संजय वर्पे तसेच नगरसेविका श्रद्धा प्रभुणे पाठक, मृणाल ववले, विशाल भेलके व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत घेतलेला हा पुरस्कार सोहळा कौतुकास्पद आहे. अभिनव विद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवित आहेत. अशाच यश प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि माजी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत केलेला सन्मान हा त्यांच्यासाठी हृदयस्पर्शी असणार आहे. अशा समारंभामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतो.

पुरस्काराला उत्तर देताना प्रवीण बढेकर म्हणाले की, मी अभिनव विद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी पणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. शालेय जीवनातील आठवणी या कधीही न विसरणाऱ्या आहेत. या पुरस्कारामुळे मला काम करण्याची आणखी उर्जा मिळाली आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये