माजी नगरसेवक दीपक पोटे यांची भारतीय जनता पक्ष पुणे शहर सरचिटणीस पदी निवड…

पुणे : भारतीय जनता पक्ष पुणे शहर सरचिटणीस पदी माजी नगरसेवक दीपक पोटे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दीपक पोटे यांची सरचिटणीस पदी निवड जाहीर केली आहे.
माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी भाजप कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष, शहर समन्वयक अशा अनेक पदांवर काम करीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दीपक पोटे यांना संधी मिळाली नाही. परंतु नाउमेद न होता पोटे यांनी धडाडीने पक्षाने दिलेली जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली आहे.

पोटे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. मला या परिवारात काम करण्याची संधी मिळाली आणि मी सतत पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता ही पक्षाने माझी शहर सरचिटणीस पदी निवड केली आहे. ही जबाबदारी देखील मी प्रामाणिक पणे पार पाडत पक्ष संघटनेसाठी काम करणार आहे.



