रामबाग कॉलनी – केळेवाडी प्रभागात हर्षवर्धन दीपक मानकर यांचा प्रचाराचा धडाका…

पुणे : कोथरूड मधील प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी – केळेवाडी प्रभागात माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर यांनी प्रभागातील मतदारांच्या भेटी घेत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
पुणे महापालिका निवडणूक प्रचारासाठी कमी वेळ मिळत असल्याने पुण्यातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी तिकीटाची प्रतिक्षा करतानाच वेळ वाया जाऊ नये म्हणून काळजी घेत प्रचारास सुरूवात केली आहे. हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मानकर यांनी निवडणूक प्रचारास सुरूवात करीत जोरदार आघाडी घेतली आहे.

कोथरूड मधील प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी – केळेवाडी प्रभागात गेली पंधरा वर्षे दीपक मानकर नगरसेवक होते. त्यांनी आपल्या कामा व्दारे या भागातील नागरिकांशी घट्ट नाते जोडले आहे. आता दीपक मानकर यांचा वारसा पुढे नेत हर्षवर्धन मानकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
हर्षवर्धन मानकर यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रभागातील केळेवाडी, सुतारदरा, जयभवानीनगर, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत.तसेच परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला आहे.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, मी गेली सात ते आठ वर्षे या भागामध्ये सामजिक काम करत आहे. माझे वडील दीपक मानकर यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात विविध विकास कामे करून नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत. त्याच पद्धतीने त्यांचा आदर्श समोर ठेवून मी सामाजिक काम करत आहे.



