कर्वेनगर मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणारच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विनोद मोहिते यांचा निर्धार…

शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ
पुणे : कर्वेनगर मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणारच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विनोद मोहिते यांनी निर्धार व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणूकीसाठी कर्वेनगर होम कॉलनी प्रभाग क्रमांक 31 मधून शिवसेना पक्षाकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी मोहिते बोलत होते.
शिवसेना जिल्हा प्रमुख रमेशबापू कोंडे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री.भैरवनाथाच्या मंदिरात नारळ फोडून प्रभाग क्रमांक ३०, होम कॉलनी-कर्वेनगर येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना विनोद मोहिते म्हणाले, गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ कर्वेनगर भागाचा विकास रखडला आहे. आम्ही कर्वेनगर मध्ये चांगला बदल घडवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. या भागातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्न आम्ही प्राथमिकता दाखवून सोडविणार आहे.
यानंतर मावळे आळी, बौद्ध विहार, कामना विहार, गोसावी वस्ती तसेच वनदेवी मंदिर परिसरातून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराची भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत शेकडो शिवसैनिक, कार्यकर्ते, मित्रमंडळी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवसेनेच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ३० मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद मारुती मोहिते (अ गट),मानसी सोमनाथ गुंड (ब गट),प्रतिक्षा विनोद जावळकर (क गट) यांनी पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा व विजयाचा विश्वास नागरिकांना दिला.



