पुणे शहर

मतदारच येतोय उमेदवाराच्या भेटीला,  लोकांच्या प्रेमामुळे भारावून गेलो -अमोल बालवडकर यांनी व्यक्त केल्या भावना 

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक रंगात आली असून सर्वच उमेदवारांनी प्रचारात जोर पकडला आहे. प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी, पाषाण मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून नागरिकांची भेटीसाठी गर्दी होत आहे. हजारो नागरिकांनी फोन व्दारे पाठींबा व्यक्त केला आहे.

प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार नागरीकांच्या पाठिंब्यासाठी प्रचार फेरी, घरोघरी भेटीगाठी सह अनेक आयडिया लढविताना दिसतात. मात्र अमोल बालवडकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अजित पवारांनी विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली. अमोल बालवडकर यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वीच बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस्, म्हाळुंगे या भागातील अनेक नागरिकांनी अमोल बालवडकर यांना फोन करित त्यांच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला.

Img 20251125 wa01782121520512185783132

अमोल बालवडकर यांना भेटण्यासाठी नागरिक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी आणि बाणेर येथील संपर्क कार्यालयात गर्दी करीत आहेत. सध्याच्या काळात एखाद्या लोक प्रतिनिधीला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा असा प्रतिसाद अपवादानेच पाहायला मिळतो. अमोल बालवडकर हे देखील येणाऱ्या सर्व नागरिकांना आपुलकीने विचारपूस करीत असून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.

अमोल बालवडकर म्हणाले, मी गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली आहे. यापुढील माझे ध्येय एकच आहे. जनतेची सेवा करणे. मी केलेल्या कामाची पावती नागरिक देत आहेत. वास्तविक उमेदवार म्हणून मी लोकांना भेटायला जायला हवे तर माझ्यावर विश्वास दाखवत लोकच माझ्या भेटीला येत आहे. लोकांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये