पूनम विशाल विधाते यांच्या नेतृत्वाखाली ‘उडान नारीशक्ती मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न

वामा वुमन्स क्लब आयोजित स्पर्धेचे उद्घाटन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते
पुणे : महिलांच्या आरोग्य, सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी वामा वुमन्स क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली “उडान नारीशक्ती मॅरेथॉन स्पर्धा” आज श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे–बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन पूनम विशाल विधाते (अध्यक्ष – वामा वुमन्स क्लब) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन भोर–राजगड–मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, फिटनेसचा संदेश समाजात पोहोचवणे तसेच महिलांचा आत्मविश्वास व सामाजिक सहभाग वाढवणे हा या मॅरेथॉन स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास माजी नगरसेविका सुषमा निम्हण, सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे, माजी स्वीकृत नगरसेवक बालम तात्या सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोथरूड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी उपसरपंच विवेक खैरे, सामाजिक कार्यकर्ते मदन पाडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपत मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका युवक अध्यक्ष माजी निलेश पाडळे, बाळासाहेब खैरे, अनिल कामठे, संजय ताम्हणे, अर्जुन ननावरे, पांडुरंग पारखे, जयराम रामदासी, भगवान खैरे, बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन विजय विधाते, रामदास विधाते, उद्योजक राजेश विधाते, जितेंद्र विधाते, निलेश विधाते, तुषार विधाते, अक्षय विधाते, माजी उपसरपंच अजिंक्य निकाळजे, अक्षय निकाळजे, सुरज कोळेकर, विजय मुरकुटे, अनिता पाडाळे, डॉ. तेजस्विनी भाले, वामा वुमन्स क्लबच्या सदस्य, तसेच समस्त विधाते कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.



उद्घाटनप्रसंगी आमदार शंकर मांडेकर यांनी महिलांच्या आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत समाजात पुढाकार घेतल्यास सकारात्मक परिवर्तन निश्चित घडते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. आयोजक सौ. पूनम विशाल विधाते आणि वामा वुमन्स क्लबच्या संपूर्ण कार्यकर्त्या व स्वयंसेवक टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सहभागी महिलांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, भविष्यातही अशा आरोग्यविषयक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“उडान नारीशक्ती मॅरेथॉन” ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता महिलांच्या आत्मविश्वासाचा, आरोग्याचा आणि नारीशक्तीच्या एकतेचा उत्सव ठरली.



