दिवा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घरेलू महिला कामगारांना सन्मानधन वितरण

रामबाग कॉलनी- केळेवाडी प्रभागातील घरेलू महिला कामगारांना सन्मानधन वितरण… हर्षवर्धन मानकर यांचा उपक्रम
पुणे : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, पुणे आणि दिवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घरेलू महिला कामगारांसाठी सन्मानधन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होत घरेलू कामगार महिलांना शासनाच्या वतीने मिळणारे सन्मानधन वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर म्हणाले, यावर्षी आपल्या प्रभागातील जवळपास १५३ घरेलू महिला कामगारांना प्रत्येकी १०,००० रुपये सन्मानधन ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले. घरेलू महिला कामगार हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या या योजनांमुळे महिलांमध्ये आर्थिक सक्षमता आणि आत्मनिर्भरतेची भावना बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पैसे मिळाल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

सरकारच्या योजनांचा प्रभागातील नागरिकांना फायदा मिळावा म्हणून मी कायम प्रयत्नशील आहे. यासाठीच विविध योजनांची माहिती नागरिकांना देत त्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. असेही मानकर म्हणाले.
या कार्यक्रमात सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी यांनी महिलांना विविध शासकीय योजनांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन केले.