पुणे शहर

कोथरूडकरांसाठी दर्जेदार नाटकांची मेजवानी ; अजित जगताप यांच्या वतीने आमदार महोत्सवाचे आयोजन

कोथरुड : आमदार महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या कोथरूड नाट्यमहोत्सव 2021 मध्ये कोथरूडकरांना दर्जेदार नाटकांची मेजवानी मिळणार आहे. भाजपचे अजित जगताप व सुजाता जगताप यांच्यावतीने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक सोमवार १५ ते गुरुवार १८ नोव्हेंबर या कालावधीत हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये १५ नोव्हेंबरला “बायको कमाल, मेव्हणी धमाल” १६ नोव्हेंबर “वऱ्हाड निघालं लंडनला”, १७ नोव्हेंबर ला “तू म्हणशील तस” या नाटकांचे प्रयोग ठेवण्यात आले असून १८ नोव्हेंबरला संदीप खरे व सलील कुलकर्णी यांचा “आयुष्यावर बोलू काही” हा कार्यक्रम होणार आहे.

Img 20211105 wa0169

या व्यतिरिक्त १४ नोव्हेंबरला बाल दिनानिमित्त सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आनंद बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये बालचमुंसाठी विविध खेळ ठेवण्यात येणार आहेत. एकूणच येणारा आठवडा कोथरुडकरांसाठी मनोरंजनाचा ठरणार आहे.

याबाबत अजित जगताप यांनी सांगितले की, या नाट्यमहोत्सवातून कोथरुडकर रसिक श्रोत्यांचे निखळ मनोरंजन होणार आहे. कोविडचा काळ हा सर्वांसाठीच तणावाचा होता. हा तणावाचा भार हलका करण्यासाठी या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद बाल जत्रा ही लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. महोत्सवांमध्ये रोज सहभागी होणाऱ्यांसाठी भाग्यवान विजेत्यांना खास लकी ड्रॉ, आकर्षक बक्षिसेही मिळणार आहेत.

प्रवेशिकेसाठी संपर्क क्रमांक 7798587676,7796587676

Img 20211113 wa00017083259135667598191
Img 20211113 wa00008548550495670358226
Img 20211112 wa0001163110957508953616

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये