पुणे शहर

कोथरुडमध्ये कचरा वाहक – वेचक संघटनेच्या शाखेचे विजय डाकले यांच्या हस्ते ऊद्घाटन

पुणे : कचरा वाहक – वेचक संघटनेच्या शाखेचे ऊद्घाटन संघटनेचे मार्गदर्शक आणि गरीब कष्टक-यांचे नेते विजयबापु डाकले यांचे हस्ते करण्यात आले. कोथरुड भागातील विविध रहिवासी ईमारती, व्यवसायिक ईमारती , वस्त्या या ठिकाणचा कचरा गोळा करुन कोथरुड डेपो या ठिकाणी जमा करणा-या टेंम्पो चालक व वेचकांनी एकत्र येऊन  विजयबापु डाकले यांचे मार्गदर्शनाखाली संघटनेची स्थापना केली आहे.

काम करत असताना आर्थिक , आरोग्य समस्या तसेच वारंवार होणा-या अडवणुकीला तोंड देत कुटुंबाची गुजराण करणा-या  शंभरापेक्षा जास्त टेंम्पो चालकांनी या समस्यांबाबत विजयबापु डाकले यांची भेट घेतली होती. ऊद्घाटन प्रसंगी विजयबापुंनी एकीचे आणि कायदेशीर अधिकारांची जाणीव करुण दिली आणि या अडचणींवर मात करायची असेल संघटनेच महत्व खुप आहे.

Img 20230717 wa0012281293529283828163631407


याबाबतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय डाकले म्हणाले, पुणे शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस खुप गंभीर होत चालली आहे. मात्र या कालावधीत स्वतंत्र काम करीत कोणताही मोबदला न घेता शहरातील कचरा गोळा करून पुणे पालिकेच्या कचरा डेपो पर्यंत पोहचविनाऱ्या स्वच्छता दुतांचा सन्मान करून त्यांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.

कचरा वाहक – वेचक संघटनेच्या शाखेचे ऊद्घाटन यावेळी करण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून पुणे महापालिका आणि या उपेक्षित घटका मध्ये समन्वयाचे काम ही संघटना करणार आहे. या संघटनेतील लोक परिसरात पहाटे पाच पासून फिरून कोणताही मोबदला न घेता नागरिकांच्या घरातील कचरा जमा करून तो टेम्पो मधून महापालिकेच्या कचरा डेपो पर्यंत पोहचवितात मात्र हे करताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याच अडचणी सोडविण्याचा प्रयत्न ही संघटना करणार आहे. असे डाकले म्हणाले.

Img 20230511 wa0002282293142767040474980887

यावेळी मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनावणे यांनी बोलताना  आदर्श नियमावली, ओला कचरा सुका कचरा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  शाखा ऊद्घाटन कार्यक्रमाला वैजनाथ वाघमारे, विजय बगाडे , योगेश खरात, मनपाचे गणेश साठे कॅांग्रेस नेते रविंद्र माझिरे, कान्हुभाऊ साळुंखे, संघटना शाखा अध्यक्ष नामदेव पुलवळे, हंसराज गायकवाड, अमोल जाधव , महादेव धावने, धनाजी भिसे, सचिन खवळे, परशु खवळे, ज्ञानदेव वैरागर, रतन तुजारे, मोहन कांबळे, बसवराज कलशेट्टी, किशोर शेरकर, एकनाथ गालफाडे , नवभुमीचे दत्ता जाधव, बाबु दुर्गे. सचिन डाकले, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते सभासद बंधु भगिनी हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये