पुणे शहर

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा’ व ‘साडीरूपी भेटवस्तू कार्यक्रमाचे आयोजन 

नगरसेवक पुनीत जोशी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे : कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, ‘महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा’ व ‘साडीरूपी भेटवस्तू कार्यक्रम’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक पुनीत जोशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नगरसेवक पुनीत जोशी म्हणाले, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक कृतज्ञता व्यक्त करत कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या महिला भगिनींना साडी रूपी भेटवस्तू देण्यात आल्या. 

Fb img 17803875442192531368419001118856

या प्रसंगी नगरसेवक पुनीत जोशी, सुनीलजी पांडे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका मिताली सावळेकर, भाजप शहर सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दीपक पोटे, दक्षिण मंडळ अध्यक्ष गिरीश खत्री आणि प्रभाग अध्यक्ष प्राची बगाटे यांची प्रमुख उपस्थित होते.

तसेच, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे,नितीन लोखंडे,प्रशांत दामले,प्रदीपकुमार राऊत, अजय चव्हाण, सर्व मुकादम आणि आमच्या सेवाभावी सफाई कर्मचारी भगिनी उपस्थित होत्या. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये