पुणे शहर
शाई फेक प्रकरण : मनोज गरबडे व साथीदारांना पिंपरी न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केल्याप्रकरणी पिंपरी न्यायालयाने मनोज गरबडे व इतर दोघांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील अनेक वकिलांनी युक्तिवाद करून न्यायालयासमोर बाजू मांडली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची दिलेली माहिती तसेच वकिलांनी केलेला युक्तिवाद यातून पिंपरी न्यायालयाने या प्रकरणी जामीन मंजूर केला आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड येथे न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता.




