शैक्षणिक

NMIMS बी-स्कूल जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये

  • एफटी एमआयएमच्या मास्टर्स इन मॅनेजमेंट २०२२ च्या अहवालातील निरीक्षण
  • महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब. एनएमआयएमएस, मुंबई स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट’चा सन्मान.
  • वैश्विक क्रमवारीत भारतातील सर्वाधिक वेतनाचे नोकरी देणारी सूचिबद्ध बी-स्कूल.
  • चीनला मागे टाकत भारतातील ७ बी-स्कूल सर्वोच्च शंभरच्या क्रमवारीत. ॲपॅक रिजनमधून चीनचे ३ च बी-स्कूल सर्वोच्च शंभरच्या क्रमवारीत.
  • सर्वोच्च शंभर संस्थांपैकी सर्वाधिक महिला कर्मचारी व शिक्षिका असलेली संस्था.

मुंबई : बी-स्कूलच्या रँकिंगमध्ये मुंबईतील एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटला (एनएमआयएमएस – एसबीएम) जागतिक स्तरावर सर्वोच्च 100 बिझनेस स्कूलमध्ये क्रमवारी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. “फायनान्शियल टाईम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट रँकिंग” 2022 मध्ये “एनएमआयएमएस – एसबीएम”ला हा मान मिळाला आहे.


जगभरातील बिझनेस मॅनेजमेंट स्कूलसाठी फायनान्शियल टाईम्स मास्टर्स इन मॅनेजमेंटचे हे रँकिंग फार महत्त्वाचे आहे. पहिल्याच प्रयत्नात एनएमआयएमएस – एसबीएमने हा मान मिळवला आहे. एफटीतर्फे 2005 सालापासून सुरू करण्यात आलेल्या या रँकिंगचे नियम अतिशय कठीण आहेत. AACSB किंवा Equis यांची मान्यता या क्रमवारीत सहभागी होण्यासाठी अनिवार्य आहे. तसेच इतर निकषही यामध्ये विचारात घेतले जातात, ते म्हणजे विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत मिळत असलेले वेतन, त्यांचा व्यवसाय किंवा वेतनातील प्रगती, आंतरराष्ट्रीय दळणवळण, शिक्षिकांची संख्या, विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाची गुणवत्ता इत्यादी. थोडक्यात गुणवत्तापूर्ण शाळा, शिक्षण व विश्वासार्हता या निकषांवर सदर मानांकन देण्यात येते.

Img 20220910 wa0003


“जगभरातील प्रतिष्ठित व्यवस्थापकीय शाळांच्या रांगेत ‘एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, मुंबई’चा झालेला समावेश ही अतिशय गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे व रोजगार मिळवून देणे हेच आमचे पहिले उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य जोपासणे, योग्य व्यवस्थापन, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व अत्याधुनिक व्यावसायिक कौशल्यांसाठी तयार करणे, त्याद्वारे ते कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा उद्याजक म्हणून सहज यशस्वी होऊ शकतात. देशासाठी गौरवाची बाब आहे की जगभरातील शंभर मध्ये भारतातील ७ बी स्कूलचा समावेश झाला आहे.” – डॉ. प्रशांत मिश्रा, डीन, एनएमआयएमएस युनिवर्सिटी, मुंबई, स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट.

“सर्वाधिक वेतन” निकषामध्ये एनएमआयएमएस – एसबीएम एफटी एमआयएमने 52 टक्के मिळवले आहेत. अभ्यासक्रमाचा कालावधी व आजची नोकरीची स्थिती यादरम्यान विद्यार्थी वेतनाचा सरासरी फरक मोजण्यात येतो. एकंदर वाढ व समर्पक वाढीव टक्केवारी अशा प्रकारे निकष आहेत.
एफटी एमआयएमच्या निरीक्षणानुसार सर्वोच्च 100 वैश्विक बी-स्कूलपैकी 14 बी-स्कूल्सने सर्वाधिक शिक्षिका असल्याची नोंद केली होती. त्या सूचित एनएमआयएमएस – एसबीएम 54 टक्के मिळवत अग्रेसर राहिले.


“वेळेची पाऊले ओळखून आमची वाटचाल सुरू असल्याचे समाधान वाटते. विद्यार्थ्यांना व्यवस्थापनामधील सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देणे असो किंवा पायाभूत सुविधा असो किंवा अभ्यास्र्कम, शिक्षण, अभ्यासाच्या पद्धती व परिणाम याबाबत आम्ही वेळेसोबत वाटचाल करत असल्याचे समाधान आहे. या क्रमवारीमुळे आमच्या “व्हिजन 2030”ला बळ मिळाले आहे. सर्वाधिक महिला शिक्षक संख्या असल्याचा बहुमान मिळाल्याचाही अभिमान आहे. याद्वारे निरनिराळे मतप्रवाह, कल्पना व अंदाज मिळण्यात मदत होते. आमच्या कामगिरीचे श्रेय हे संपूर्णपणे कुलाधिपती, शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्या द्रष्टेपणाला जाते. उद्याचे कुशाग्र व सर्वोत्तम नेतृत्व बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विद्यार्थ्यांकरिता प्लेसमेंट सोबतच त्यांच्या करियर मधील प्रगती व माजी विद्यार्थ्यांच्या अतुलनीय यशोगाथेसाठी भारतातील अग्रगण्य व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एनएमआयएमसच्या विद्यार्थ्यांचे समावेश होणे हीच आमच्या दृष्टीकोनाची पोचपावती आहे.” – डॉ. रमेश भट्ट, कुलगुरू, एनएमआयएमएस.

Img 20220913 wa0008

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये