‘स्टॅनफॉर्ड’च्या यादीत झळकले NMIMS चे हे शास्त्रज्ञ

मुंबई : जागतिक स्तरावरील टॉप शास्त्रज्ञांच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या यादीत भारतीय शास्त्रज्ञांनी स्थान पटकावले आहे. विज्ञान क्षेत्रासाठी सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या यादीत या शास्त्रज्ञांनी वैयक्तिक शोधनिबंध सादर केले आहेत. आतापर्यंत या शास्त्रज्ञांनी एकूण ८०० पेक्षा जास्त संशोधनांसह ५० हून अधिक शोधनिबंध व प्रकल्प सादर केले आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये चौथ्या आवृत्तीमध्ये सातत्य दाखवत या शास्त्रज्ञांनी दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान पटकावले आहे. NMIMS च्या प्राध्यापकांची स्टॅनफोर्डच्या जागतिक क्रमवारीत २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत वर्णी लागली आहे.

NMIMS ने 800 हून अधिक नाविन्यपूर्ण शोधनिबंध आणि व्यावसायिक घडवले आहेत. याचे जागतिक संस्थांनी खूप कौतूक केले आहे. SVKM च्या NMIMS ने सलग दुसऱ्यांदा आदर्श प्रस्थापित केला आहे. NMIMS ची मल्टी डोमेन स्पेशलायझेशन देणारी प्रीमीयम बी स्कूल अशी ओळख आहे.
स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट हैद्राबादचे चार शास्त्रज्ञ, SVKM NMIMS चे डॉ. योगेश कुलकर्णी, सहयोगी डीन डॉ. प्रवीण शेंडे, प्राध्यापक डॉ. सोनाली भरते, सहयोगी प्राध्यापक मुक्ता अग्रवाल हे सलग दुसऱ्या वर्षी जागतिक टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत झळकले आहेत.
जागतिक टॉप 2 टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान पटकावल्याने संशोधक व संस्थेस जागतिक मान्यता मिळते. यासाठी शास्त्रज्ञांचे २२ वैज्ञानिक गटांत व १७६ वैज्ञानिक उपगटांत वर्गीकरण केले जाते. सी-स्कोर किंवा दोन टक्के व त्यावरील पर्सेंटाइल रँक असलेले टॉप एक लाख शास्त्रज्ञ करिअर-लाँग डेटाच्या आधारे निवडले जातात. एच-इंडेक्स, सह-लेखकत्व, व एक संमिश्र निर्देशक स्कोपस डेटाबेसमध्ये समाविष्ट असलेल्या बिब्लियोमेट्रीक माहितीच्या आधारे तयार केला जातो. त्यात ८ दशलक्षाहून अधिक वैज्ञानिकांचे एक लाख ८० हजारांहून अधिक संशोधन समाविष्ट असते.



डॉ. योगेश कुलकर्णी यांचे मधुमेह समस्यांवर संशोधन
असोसिएट डीन डॉ. योगेश कुलकर्णी हे मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत १६ वर्षांपासून संशोधन करत आहेत. काही पारंपारिक संशोधन, नैसर्गिक उत्पादने आणि आयुर्वेदीक औषधे ते सर्व प्रकारचा मधूमेह आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थापनासाठी वापरतात. नॅनोपार्टिक्युलेट डिलिव्हरी सिस्टीम, नॉव्हेल बायोसेन्सर, नियंत्रीत आणि शाश्वत औषध वितरण प्रणाली, ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, बायोकॅरियर ड्रग डिलीव्हरी सिस्टीम, डीओई-आधारित फॉर्म्युलेशन आणि डेव्हलपमेंट, लक्षित औषध वितरण प्रणाली, ऑन्कोलॉजिक फॉर्म्युलेशन, प्रोटीन, पेप्टाइड यांच्यावर व डीएनए आधारित फॉर्म्युलेशन डॉ. प्रवीण शेंडे या प्राध्यापकांनी केले आहे.
नॅनोपार्टिकल आणि अल्झायमर या आजारांवर संशोधन
प्री फॉर्म्युलेशन अभ्यासावर आणि रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन रासायनिक घटकांच्या विकासावर डॉ. सोनाली भरते या सहयोगी प्राध्यापिका काम करत आहेत. तर, सहाय्यक प्राध्यापक सुश्री मुक्ता अग्रवाल या नॅनोपार्टिकल आणि अल्झायमर या आजारांवर संशोधन करत आहेत.



SPPSPTM विषयी थोडक्यात
SVKM NMIMS अंतर्गत शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलटजी मॅनेजमेंटची (SPPSPTM) 2006 साली स्थापना करण्यात आली. हे एक फार्मसी स्कूल आहे. येथे फार्मास्युटिकल सायन्समध्ये डॉक्टरेट, पदव्युत्तर, पदवीधर व डिप्लोमा हे अभ्यासक्रम आहेत. फार्मसी आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनामध्ये एकात्मिक कार्यक्रम सादर करण्यात हे स्कूल अग्रेसर आहे. हा अभ्यासक्रम तरूणांना जबाबदार फार्मा व्यावसायिक बनवतो आणि विकसित करतो. जे फार्मा उद्योग, रुग्णालये, समुदाय, समाज आणि आरोग्य-सेवा प्रणालीच्या भविष्यात नैतिकतेचे योगदान देतात.
“NMIMS Deemed-to-be university” ला अशाप्रकारे प्रतिभावान प्राध्यापक लाभले आहेत. आमचे प्राध्यापक विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. तसेच इतर सहकाऱ्यांसाठी त्यांनी एक दिशादर्शन मार्ग तयार केला आहे. या प्राध्यापकांनी संशोधन कार्याचा केलेला पाठपुरावा वैज्ञानिक संशोधन बंधुत्वाला पुढे जाण्यासाठी नवी दिशा देणार आहे.”
– डॉ. बाला प्रभाकरन, डीन, शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी ॲण्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट.