पुणे शहर

कोथरूडमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी. या मागणीसाठी फलकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रश्न उपस्थित 

पुणे : माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूला नऊ महिने उलटून गेले, मात्र आजही अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत.ना FIR,ना तपासाबाबत ठोस माहिती,ना चौकशीचा अहवाल,ना अपघातामागील सत्य जनतेसमोर असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघ अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी फलकाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत.

गिरीश गुरुनानी म्हणाले, आमदार रोहितदादा पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून, या प्रश्नांची उत्तरे मिळणे हा केवळ राजकीय विषय नसून सत्य आणि न्यायाचा प्रश्न आहे.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299

“अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे!”हीच भावना व्यक्त करण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी फलक लावून जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहितदादा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, ही आमची स्पष्ट मागणी आहे.

अजितदादांच्या मृत्यूचे सत्य समोर येऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न उपस्थित होत राहणार! न्याय मिळालाच पाहिजे! सत्य समोर आलेच पाहिजे अशी मागणी गिरीश गुरुनानी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये