पुणे शहर

पुण्यात पार पडला पत्नी पीडित पुरुषांचा महामेळावा; पुरुष स्वाभिमान फाउंडेशनच्या वतीने आयोजन

पुणे : पुरुष स्वाभिमान फाउंडेशन तर्फे पत्नी पीडित पुरुषांचा महामेळावा आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तसेच राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने पुरुषांनी उपस्थिती दर्शवली. एकूण सुमारे ९०० ते १००० उपस्थितांची नोंद झाली.

सदर मेळाव्यात खोट्या ४९८अ, तसेच डोमेस्टिक व्हायोलन्स आणि पोटगी संदर्भातील प्रकरणे प्रभावीपणे कशी लढायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञांकडून कायदेशीर बाबींचे विश्लेषण करत उपस्थितांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यात आले.

Img 20260222 wa00064282746827061526116

या मेळाव्यात जेंडर न्यूट्रल कायदे लागू करण्याची तसेच पुरुष आयोगाची स्थापना व खोट्या केसेस करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. उपस्थितांनी या मागण्यांना जोरदार पाठिंबा दर्शवला.

Img 20260427 wa00135447164512703531756

कार्यक्रमाला फौंडेशनचे अध्यक्ष संकेत दाभाडे, उपाध्यक्ष तुषार भोसले तसेच रोहित नागवंशी, संजय पवार, तुषार चौधरी आणि बालाजी डोरनपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पुणे शहरातील संस्थेचे पदाधिकारी रोहित नागवंशी, अभिजित जगताप, श्रीयश राऊत, अभिषेक साळी, राहुल झापरडे, नीलकंठ वाघमारे, प्रकाश चव्हाण आदींनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये