पुणे शहर

गौतमी पाटील यांचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करणारे दोघे ताब्यात

पुणे : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा अश्लील व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे सखोल तपास करून गौतमी पाटील यांचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपी आयुष अमृत कणसे (वय 21, रा. भरतगाव वाडी, ता. सातारा) तसेच सतरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचे इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट तयार करून त्यांचा अश्लील व्हिडिओ वायरल केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशन येथे 25 फेब्रुवारी 2023 रोजी विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक( गुन्हे )संगीता माळी या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून विमानतळ पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीचा तपास लावला. या गुन्हयामधील वरील दोन्ही आरोपींचा सहभाग लक्षात आल्यावर त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. या गंभीर गुन्ह्यातील अश्लील व्हिडिओ तयार करणारा मुख्य आरोपीचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्रीमती संगीता माळी, सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शेवाळे, पोलीस हवालदार किरण खुडे, पोलीस नाईक रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, महिला पोलीस शिपाई आस्मा शेख,रेणुका भोगावडे,प्रियंका शिंदे यांच्या पथकाने या गंभीर गुन्ह्याचा शिताफिने तपास केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी करीत आहेत.

Img 20230503 wa00066055551718246966984
Img 20230503 wa00128836785746506742437
Img 20220425 wa0010282295230586519690125679

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये