पुण्यातील अतिक्रमण, कचरा समस्या आणि वाहतूक कोंडी हे सत्ताधारी भाजप नेत्यांचे अपयश नगरसेवक अमोल बालवडकर

पुणेकरांच्या मूलभूत प्रश्नांवर बालवडकर आक्रमक
पुणे : पुणे शहरातील अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी या तीन प्रमुख समस्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत पुण्यातील सत्ताधारी भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत. सताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने कामे होत नसल्याची टीका नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे.
अमोल बालवडकर म्हणाले की, पुण्यातील सत्ताधाऱ्यांचा महापालिका प्रशासनावर अंकुश नसल्याने शहरातील प्रश्न सुटत नाहीत. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागातील अतिक्रमणावर कारवाई होत नाही.यासाठी त्या नगरसेवकांना आंदोलन करावे लागते.शहराच्या अनेक भागांत अवैध अतिक्रमणे वाढत असून त्यामुळे पदपथ आणि रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. पादचारी आणि वाहतूक दोन्ही बाधित होत असल्याने नागरिकांना रोजच्या जीवनात मोठा त्रास होत आहे. “अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घ्यावी आणि कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

स्वच्छतेत पुण्याचा 18 वा क्रमांक, कोट्यवधी रूपये खर्चून ही शहरात स्वच्छतेची समस्या गंभीर – अमोल बालवडकर
कचरा व्यवस्थापनाबाबत बोलताना बालवडकर यांनी म्हणाले , की, स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये आपण पहिल्या 10 क्रमांका बाहेर फेकले गेलो आहोत. स्वच्छतेत पुण्याचा 18 वा क्रमांक लागतो.महापालिका मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असतानाही शहराच्या अनेक भागात कचरा साचलेला दिसतो. स्वच्छतेच्या बाबतीत यंत्रणेत गल्लत आणि हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जनतेच्या कररूपी पैशातून स्वच्छतेसाठी खर्च होत असेल, तर त्याचे दृश्य परिणाम रस्त्यांवर दिसले पाहिजेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे,” असा इशाराही त्यांनी दिला.
वाहतूक प्रश्नांवरही बालवडकर आक्रमक
नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले ,बाणेर-बालेवाडीसह शहराच्या अनेक भागांत वाहतूक कोंडी वाढली असून त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. वाहतूक नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि आवश्यक ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही स्वच्छता, अतिक्रमण आणि वाहतूक या विषयांवर मी सातत्याने आवाज उठवला आहे. या मूलभूत समस्यांना प्राधान्य देण्याची मागणी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना केली आहे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या प्रश्नांचे निराकरण झाल्याशिवाय शहराचा खरा विकास होणार नाही,



