पुणे शहर

पुण्यात आयुक्तांकडून अतिक्रमण निर्मूलन व पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा

पुणे : महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली अतिक्रमण निर्मूलन तसेच शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299

या बैठकीस शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग मुख्य अभियंता बनकर, प्रकल्प विभाग मुख्य अभियंता दिनकर गोजरे, भवन विभाग मुख्य अभियंता  बिपीन शिंदे, तसेच उपायुक्त अविनाश सकपाळ,  आशा राऊत, विजयकुमार थोरात, संदीप कदम आणि अरविंद माळी तसेच प्रसाद काटकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये शहरातील अतिक्रमणांची सद्यस्थिती, अतिक्रमण निर्मूलनासाठी करण्यात येणारी कार्यवाही तसेच रस्ते, पदपथ, दुभाजक (डिव्हायडर) आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक रस्ते व पदपथ नागरिकांसाठी अडथळामुक्त ठेवणे, वाहतुकीस सुलभता निर्माण करणे तसेच शहरातील पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.

शहरातील अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये