पुणे शहर

कर्वेनगर चौकात भीषण अपघात!  बसखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू

पुणे : कर्वेनगर चौकात रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली आल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बसच्या चाकाखाली डोके सापडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.  मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, कर्वेनगर चौकातील पुलाखाली रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. या परिसरात बेशिस्त वाहतूक होत असून वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने पादचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत घडलेल्या या भीषण अपघातामुळे चौकातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या चौकातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसह संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले असून तशी  मागणी नागरिकांकडून होत आहे.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये