पुणे शहर

पुण्यात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यास दुकानदाराची जबर मारहाण ; कामगार युनियनची पोलिसांकडे कारवाईची मागणी

पुणे : रस्त्यावर पोत्यात भरून कचरा फेकून देणाऱ्या दुकानदाराचा पत्ता शोधून कचरा परत करणाऱ्या सफाई सेवकाला मारहाण झाल्याचा प्रकार भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत आज घडला. संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी कामगार वर्गाकडून पोलिसांकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्रमांक १८ श्रमदान मारुती हजेरी कोठी कडील सफाई सेवक संतोष अरुण जाधव हे नेहमीप्रमाणे सकाळी टिंबर मार्केटच्या परिसरात सावित्रीबाई फुले स्मारकासमोर रस्त्याची सफाई करत असताना सदर ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा भरलेली पोत्याची गोणी फेकून दिल्याची त्यांना आढळून आली. त्या गोणीतील कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरलेला होता. त्यामुळे सफाई सेवकांनी कचर्‍यात हात घालून पत्ता शोधला. त्यात “राजदिप हार्डवेअर” या दुकानाचे

बिल पावत्या सापडल्या त्यामुळे त्यांनी तो कचरा पोत्याच्या गोणीत भरून त्या दुकानासमोर ठेवून दिला व दुकानातील कामगारास सांगीतले की,”सदर कचरा तुमचा आहे तुम्ही महानगरपालिकेच्या घंटा गाडीला किंवा स्वच्छ सहकारी संस्थेच्या कचरा व्यवस्थाकांना द्या असे रस्त्यावर कचरा फेकू नका अशी त्याने विनंती केली.

Fb img 1647413711531 1

त्यानंतर राजदीप हार्डवेअर दुकानाचे मालक यांनी ” तुने मेरे दुकान के सामने कचरा क्यों डाला ये कचरा यहाँ से उठा” अशी वादावादी करत कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. कर्मचाऱ्याने हम दुकान का कचरा नही उठा सकते तुम्हारे दुकान का कचरा उठाने के लिए स्वच्छ सहाकारी संस्थे की महिला के पास दे दो”! असे सांगितले त्यावर सदर दुकान मालकाने सफाई कर्मचार्‍याबरोबर वाद घालत त्याला मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. शिवाय डोक्यावर दुकानदाराने हातातील जाड कड्याने मारहाण केल्यामुळे खोलवर जखम होऊन तीन टाके पडले आहेत.

Img 20221012 192956 045 1

सदर मारहाण झालेली बातमी मुकादम शिरीष आंदेकर व राजू परदेशी यांनी आरोग्य निरीक्षक राजू बागुल व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, संतोष कदम यांना दिली. सदर अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित घटनास्थळी बोलवून घेतले. सदर घटनेची समक्ष पाहणी करून पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे विभागीय अध्यक्ष राम अडागळे, धनंजय आयवळे, संतोष चव्हाण, ओंकार काळे, प्रकाश चव्हाण व अनिल घाडगे या पदाधिकाऱ्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना एकत्र करून प्रभागातील काम बंद करून रामोशी गेट पोलीस चौकी या ठिकाणी लेखी फिर्याद देऊन आंदोलन करून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला.

Img 20221107 wa00246242446261228342920

मारहाण केलेल्या दुकानदारास सरकारी कर्मचाऱ्यावर मारहाण केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा द्यावी अशा प्रकारचे निवेदन पोलीस चौकीला देण्यात आले आहे. यापुढे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व सफाई कामगारांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाली तर आम्ही पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण मध्ये रात्री अपरात्री काम करणाऱ्या सफाई सेवकांना व अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले पाहिजे अशा प्रकारचे निवेदन पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्त यांना युनियनच्या वतीने देण्यात आले.

सिंहासन NEWS -पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँकेच्या निवडणूकीसाठी श्री स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार जाहीर
https://www.sinhasannews.com/candidates-of-shri-swami-samarth-panel-for-pune-municipal-corporation-bank-election-announced-14581/

Img 20221107 wa00231753521829434315593
Screenshot 2022 11 08 17 30 12 863027856036357080963

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये