पुणे शहर

पुणे महापालिकेत बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचा ई मेल; मोठी खळबळ महापालिका इमारत रिकामी केली 

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय व माननीय महापौर कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट बाबतचा ई मेल थेट प्राप्त झालेला आहे. यांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचने नुसार संपुर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली आहे.

पुणे पोलीस बॉम्ब शोधक पथकाकडुन शोधकार्य चालु आहे, शोधकार्य पूर्ण झाल्यानंतरच मुख्य इमारत कामकाज चालु होईल , तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

पुणे महानगरपालिका आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अधिकृत कार्यालयाला, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय आणि नागपूरच्याच विधानभवन इमारतीला आयईडी (IED) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण पालिका वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Fb img 17810625583347571566663466213158

मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल खलिस्तान नॅशनल आर्मी कडून पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन वूड रोज’ चा थेट उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तत्कालीन ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला पाठिंबा दिला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी या तीन मुख्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. या धमकीमध्ये विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

Img 20260610 wa0042687425595384326769

तसेच हा धमकीचा मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, तो खरा आहे की केवळ अफवा पसरवण्यासाठी पाठवलेला बनावट मेल आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. ई-मेलच्या आयपी ॲड्रेसचा माग काढून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Img 20260610 wa00293570860258582207219
Img 20260609 wa00028948864962657440663

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये