पुणे शहर

पुणे शहरात सोमवार (ता.15) पासून पाणीकपात; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय….

पुणे : पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता.१५) पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.या आठवड्यात महापालिकेतर्फे पाणी कपातीचे नियोजन केले जाणार असून त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. आज (ता.८) महापौर मंजुषा नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, यावर्षी पावसाची शक्यता कमी वर्तवण्यात आलेली आहे‌. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकेत बैठक पार पडली यामध्ये पाणी कपात करण्यासह पाण्याची बचत करण्यासंदर्भात चर्चा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे. पाणी कपात करताना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून सोमवारपासून याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे‌. पाण्याचा वापर जास्त होतो अशा वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव या ठिकाणी पूर्णपणे निर्बंध घातले जाणार आहेत.

Img 20251125 wa01783213374507166536090

पाणी कपात करण्यापूर्वी महापालिकेकडून काही दिवस आधी परिपत्रक जाहीर केले जाईल त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल‌ पाणी कपाटाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नागरिकांना पाण्याचे साठवण करण्यासाठी चे नियोजन करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाईल.

हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यामध्ये एलनिनो वादळाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी अनेक ठिकाणी आवर्षणाची स्थिती निर्माण होणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणात सध्या पाच टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. हे पाणी पुढील तीन महिने पुरवणे आवश्यक आहे. हे धरणातील पाणी सिंचन, आषाढी वारी यासाठी देखील पाणी सोडावी लागणार आहे. बाष्पीभवनामुळे देखील पाणीसाठा कमी होत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात पाटबंधारे विभागाने महापालिकेला यापूर्वीच पाणी कपात करण्याची सूचना केलेली होती मात्र महापालिकेने ३१ मे पर्यंत शहरात पाणी कपात न करण्याचा निर्णय जाहीर केलेला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये