महाराष्ट्र

अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली,  या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे.  तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी  निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून  105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाही.

Fb img 17620776420884188237802217418510

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.  दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Img 20250508 wa00011184667503723765598

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायती निवडणूक कार्यक्रम.

1) नामनिर्देशन फॉर्म भरण्याची सुरुवात तारीख 10 नोव्हेंबर

2) नामनिर्देशन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर

3) छाननी 18 नोव्हेंबर

4) नामनिर्देशन फॉर्म माघार तारीख 21 नोव्हेंबर

5) अंतिम उमेदवार जाहीर करण्याची तारीख 25 नोव्हेंबर

6) निवडणूक चिन्ह देण्याची तारीख 26 नोव्हेंबर

7) मतदान तारीख 2 डिसेंबर

8) निवडणूक निकाल 3 डिसेंबर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये