पुणे शहर, जिल्हा

जयस्तंभ अभिवादन पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन

विविध संस्था, संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे – कोरेगाव भीमा जयस्तंभ या ठिकाणी दरवर्षी एक जानेवारी रोजी मानवंदना देण्यासाठी राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकरवादी अनुयायी येत असतात. याबाबत पूर्वनियोजन बैठक शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीला अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या बैठकीसाठी सर्व संस्था, संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये