आपुलकी, पुणे तर्फे धान्यरूपी भेट…

पुणे : समाजातील अनेक घटक आहेत ज्यांचे काम धंदे बंद झाले साखळी बिघडली पण तरीपण न हरता न थकता जिद्दीने या संकटावर धैर्याने तोंड देत आहेत अश्या सर्व समाजबांधवांना आपुलकी, पुणे तर्फे मदत नव्हे तर एक धान्यरुपी भेट देण्यात आली.त्याची जय्यत तयारी अशी की 8500 किलो धान्य पॅकिंग करण्यात आले.
पहिल्या लॉक डाउन मध्ये 880 कुटुंबाना आपुलकी पुणे संस्थेने धान्यरूपी भेट दिली होती या दुसऱ्या लॉक डाऊनमध्ये पुन्हा 750 कुटुंबाना धान्य रुपी भेट दिली. यामध्ये स्कूल व्हॅन चालक, रिक्षा चालक, लोक कलावंत, पौरोहित्य करणारे, वैकुंठ मधील कर्मचारी, स्वछता कर्मचारी, चर्मकार वर्ग, वासुदेव, कडकलक्ष्मी अश्या अनेक प्रवर्गा मध्ये ही भेट देण्यात आली.

या कार्यात अनेकांचे हातभार लाभले हे एकट्याचे काम नसून टीमवर्क शिवाय हे शक्य नाही.यात आदित्य सहस्रबुद्धे, चेतन नातू, विशाखा पाटील, अबोली पोतनीस, तृप्ती पै, झिंगाट फॅमिली धनंजय काळे, धर्माधिकारी काका, सुहास महामुनी, योगेश कुलकर्णी या आणि अश्या अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. असे आपुलकी पुणेचे समीर रुपदे यांनी सांगितले
ही धान्यरूपी भेट भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, धीरज घाटे, उपनिबंधक आर एस धोंडकर, मा. संदीप खर्डेकर, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, मिलिंद भोई, पराग ठाकूर, किशोर चव्हाण, अभय ठकार, देवीदास घेवारे तसेच या भागातील पोस्टमन काका, आणि अग्निशामक दलातील कर्मचारी यांच्या हस्ते देण्यात आली.



