पुणे शहर
माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो स्थानकांंची नावे बदलण्यात यश-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : माण-हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील स्थानकांना भौगोलिक स्थानांवरून नावे द्यावीत, या मागणीला यश आले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे.
मेट्रोचा शिवाजीनगर ते हिंजवडी मार्ग छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून जातो. यातील यशदा, आरबीआय आणि शेतकी महाविद्यालय ही नावे भौगोलिक स्थानांवरून नसून तेथील इमारतींवरून देण्यात आली आहेत. यात बदल करावेत, अशी मागणी दिनांक १ जून २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

‘यशदा’चे नाव ‘सकाळनगर’, ‘आरबीआय’ स्थानकाला ‘भोसलेनगर आरबीआय’ हे दोन बदल करण्यात यश आले आहे. ‘शेतकी महाविद्यालय’ चे नाव बदलून ‘मॉडेल कॉलनी’ करण्याची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.



