अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पालकत्व घेतल्याने मुलींचा शैक्षणिक प्रवास सुरू ..

पुणे : pune city शिक्षणाला कमी महत्व देऊन किवा वाढलेल्या शैक्षणिक खर्चाचे कारण देऊन मुलींना घरकाम, धुणी भांडी या कामाला जुंपले जाते, पर्यायाने त्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होतो. परंतु अशा मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी मुलगी शिकली प्रगती झाली या उपक्रमाअंतर्गत केवळ फी अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक गरीब मुलींचे शैक्षणिक पालकत्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतले आहे. The educational journey of the girls started with the taking over of guardianship by the All India Brahmin Federation

अभिजात शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित शौनक अभिषेकी, तसेच नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत नगरसेविका मिताली सावळेकर उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे शैक्षणिक प्रवास परत सुरु झाल्याचा आनंद अनेक मुलींच्या चेहऱ्यावर यावेळी पहिला मिळाला.
अभिजात शाळेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच महासंघाच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपास्थित होते. मुलींच्या शिक्षणासाठी महासंघ करत असलेल्या कामाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले व आगामी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या गरीब मुलींसाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक अनुदान व शैक्षणिक साहित्य एक कर्तव्य म्हणुन देण्यात आले.



मंदार रेडे यांनी प्रास्ताविक करताना महासंघाच्या प्रगतीचा, संघटनेची माहिती दिली. जयश्री घाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केतकी कुलकर्णी यांनी केले तर राहुल जोशी यांनी आभार मानले.



























