पुणे शहर

बाणेर मध्ये वामा वुमेन्स क्लब आणि पूनम विशाल विधाते यांच्या वतीने आयोजित MRS WAMA QUEEN २०२५ या इंटर सोसायटी स्पर्धेचा ग्रँड फिनाले सोहळा उत्साहात पार पडला…

पुणे : वामा वुमेन्स क्लबच्या आणि पूनम विशाल विधाते यांच्या वतीने आयोजित MRS WAMA QUEEN २०२५ या इंटर सोसायटी स्पर्धेचा ग्रँड फिनाले सोहळा यशस्वीपणे आणि मोठ्या उत्साहात पार पडला. विविध सोसायट्यांमधील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, कला आणि सादरीकरणाच्या जोरावर रंगतदार स्पर्धा साकारली.

पूनम विशाल विधाते म्हणाल्या, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी आणि परिसरातील महिलांसाठी खास असलेल्या या मंचावरून महिला सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या भूमिकेचा प्रभावी संदेश देण्यात आला. विजेत्या महिला तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनी दाखवलेली मेहनत, प्रतिभा आणि उमेद खरोखरच कौतुकास्पद आहे.या स्पर्धेतील सर्व विजेत्या मानकरी आणि सहभागी महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!आपल्या सहभागामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.

Img 20250508 wa00015038950216212096978

या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ संगीता गोरड,  सौ. मनू भोगांवकर, सौ केतकी सोगावकर यांनी जबाबदारी पार पाडली.तर सूत्र संचालन डॉ तेजस्विनी भाले यांनी केले. यावेळी सहकारी टीम मध्ये शोभा श्रीकान्त, रूपाली बार्शीकार, मानसी हीरेकोडी, श्वेताश्री, गीताश्री, सुजाता अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

केटेगरी सिल्वर- वय २५-४९

Mrs. WAMA Queen – अमृता खतावकर

Mrs. Graceful Diva – टोपस्वेता भट्टाचार्जी

Mrs. Confident – गौरी जगदाळे

Mrs. Stylish Walk – श्वेता जैन

Mrs. Popular Choice – इंदु राठोड

Gold category – वय ५० पुढ़े

Mrs. WAMA Queen – सौ. वनिता बिडवई

Mrs. Graceful Diva – सौ. नीता जवळेकर

Mrs. Confident – डॉ. मंगला सावरकर

Mrs. Stylish Walk – मोनिता पवार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये