शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांचे रक्तदान

पुणे : शिवप्रताप प्रतिष्ठान कोथरूडच्या वतीने आयोजित महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर शिवचैतन्य सभागृह येथे झाले. यावेळी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तसेच महाराजांना पुष्पहार व दीपप्रज्वलन नगरसेवक माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेवक रामचंद्र कदम, उद्योजक बाप्पूशेठ वाघमारे, वासंती जाधव, अल्पना वरपे, जयंत भावे, किशोर शिंदे , आश्विनी जाधव, हर्षवर्धन मानकर, दिलीप शेळके, पुणे वृत्तपत्र विकेता सघाचे विश्वस्त अनंता केंडे, अध्यक्ष: अतुल शिंदे यांनी रक्तदान व रक्तदातांचे स्वागत केले.
यावेळी काही महिलांनी रक्तदान केले व काहींनी प्रयत्न केले त्यांना शिवप्रताप प्रतिष्टाण तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सूत्र संचालन चंद्रकांत शिंदे, संदीप कुंबरे यांनी केले.
आयोजन: शिवप्रताप प्रतिष्ठाण, कोथरूड यांनी केले होते.




