पुणे शहर

बावधन मधील एकूण ८ अनधिकृत RMC प्लांटवर महापालिकेचा जेसीबी…

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या जन आंदोलनानंतर प्रशासनाला झाली कर्तव्याची जाण..

बावधन : बावधन बुद्रुक व  बावधन खुर्द परिसरात असणाऱ्या एकूण ८ अनधिकृत  RMC प्लांट वर पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज धडक कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असलेल्या या RMC प्लांटविरोधात नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पुढाकाराने बावधनमध्ये जनआंदोलन उभारण्यात आले होते. या जन आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनाला अखेर घ्यावी लागली असून आज झालेल्या कारवाई मुळे ही आंदोलन यशस्वी ठरले असल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंधरा दिवसांपूर्वी ओंकार गार्डन चौकात व काल कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून तत्काळ कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

Fb img 17722786558115856474783028037709

अनधिकृ RMC प्लांटमुळे निर्माण होत असलेली धूळ, प्रदूषण आणि अवजड वाहनांच्या त्रासामुळे आणि होत आलेल्या अपघातांमुळे नागरिकांच्यामध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संतप्त भावना होत्या. तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले गेले आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात मोठी असंतोषाची लाट सत्यावर पाहायला मिळाली. लोकांची कामे करत नसला तर असे महापालिकेचे कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आम्हाला नको त्याला टाळे लावा अशी भूमिका किरण दगडे पाटील यांनी घेतल्यानंतर प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाल्याचे दिसत आहे.

या संदर्भात किरण दगडे पाटील म्हणाले, कोणत्याही प्रश्नात झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला आता जाग आणून द्यावी लागत आहे. बावधन मधील अनधिकृत RMC प्लांट विषयात सुस्त झालेले प्रशासन जागे करण्यासाठी आम्हाला जन आंदोलनात उभारावे लागले आणि त्यापुढे प्रशासनाला अखेर झुकावे लागले. या अनधिकृत RMC प्लांटमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या कारवाईमुळे या त्रासातून आता सुटका मिळणार आहे. आज ही कारवाई झाली असली तरी भविष्यात हे RMC प्लांट सुरू होणार नाहीत यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी..आम्हीही त्यासाठी प्रयत्नशील राहू

आज झालेल्या कारवाईत बावधन बुद्रुक येथील 6 अनधिकृत RMC Plant  व बावधन खुर्द येथील 2  RMC Plant असे एकूण 8 RMC Plant यांना पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 3 मार्फत नोटीस देऊन  कारवाई करण्यात आली. सदरील कारवाई मधे अंदाजे 28000 चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत पत्रा शेड निष्कासित करण्यात आले.

Img 20260222 wa00062533337530738087765

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये