पुणे शहर

हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन.. चुरशीच्या कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी..

पुणे : कर्वेनगरमध्ये मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरवात झाली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कुस्त्या कुस्ती प्रेमी मंडळींना पहिल्या दिवशी पहिला मिळाल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून विजेत्याला देण्यात येणारी. चांदीची गदा मैदानात दाखल झाली आणि हालगीच्या निनादत एकच जल्लोष झाला. राज्य मंत्री विश्वजित कदम यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कोथरुड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय खळदकर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . कर्वेनगर मधील सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या कै. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरीमध्ये पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, माणिक दुधाणे, परिसरातील नागरिक व कुस्ती प्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश बागवे यांनी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन उत्तमरीत्या केल्याबद्दल आयोजक विजय खळदकर यांचे कौतुक केले व आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. 

पुणे कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने आणि हवेली तालुका कला क्रीडा निमंत्रित व मैत्रीप्रतिष्ठान आयोजित या हवेली अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी चुरशीच्या कुस्त्या उपस्थितांना पाहिला मिळाल्या. तब्बल वीस वर्षानंतर कर्वेनगर मध्ये कुस्त्या होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Img 20220414 130128 501 1
Img 20220414 wa0001
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये