राष्ट्रीय

हवामान विभागाकडून मोसमी पावसाचा पहिला अंदाज जाहीर

पुणे : भारतीय हवामान विभागाने मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार असून, सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातही पावसाची स्थिती चांगली राहणार आहे. मराठवाडय़ाच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. 

पुढील सुधारित आणि दुसऱ्या टप्प्यातील अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल. त्यानंतर नव्या धोरणानुसार हंगामातील प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाकडून एप्रिलच्या सुरुवातीच्या काळातील वातावरणाच्या स्थितीचा आधार घेण्यात आला आहे.

मोसमी पावसाला पूरक ठरणारा हिंद महासागरातील ‘ला निना’ हा घटक संपूर्ण मोसमात सक्रिय राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि  मध्य भारतात अनेक ठिकाणी , हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोसमी पावसाच्या संभाव्य स्थितीच्या अवकाशीय वितरणाचा नकाशाही भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात मोसमी पाऊस तुरळक भाग वगळता जवळपास सर्वत्र सरासरी गाठण्याची शक्यता आहे. काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचाही अंदाज आहे.

Img 20220414 130128 501 1
Img 20220414 wa0001
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये