वारजेत पहिल्यांदाच भरणार साहित्यिकांची मांदियाळी ; साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने एक दिवसीय साहित्य संमेलन

वारजे : पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्यिक कट्टा वारजे हा पुणे शहरात सर्वात जास्त सक्रिय असणारा साहित्य कट्टा म्हणून नावाजला गेला आहे. वारजे परिसरातील नागरिकांची साहित्यिक भूक भागवली जावी, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं म्हणून माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी पाठपुरावा करून हा साहित्य कट्टा सुरू केला. याच साहित्य कट्ट्याच्या माध्यमातून वारजे परिसरात एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यामुळे वारजेत पहिल्यांदाच साहित्यिकांची मांदियाळी भरणार आहे. Literary fair will be held in Warje for the first time; A one-day literature meet on behalf of Literary Katta Warje
पुणे महानगरपालिका, मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजेच्या आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय मराठी साहित्य संमेलना विषयी माहिती देताना संमेलनाच्या निमंत्रक पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ यांनी सांगितले की, वारजेत होणारे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ७ जानेवारी सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत बाएफ संस्थेच्या डॉ. मणीभाई देसाई सभागृहात पडणार आहे. सकाळी ९ वाजता गणेश मंदिर ते बाएफ ग्रंथदिंडी निघणार असून शिवचरित्रकार ह.भ. प धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांच्या हस्ते होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.न.म.जोशी उपस्थित असणारा आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे उपस्थित असणार आहेत. यावेळी अनिल हिंगे यांना उद्योगरत्न पुरस्कार, प्राध्यापक एस.आर.पाटील यांना समाजरत्न पुरस्कार तर निर्मला कैलास खिलारे यांना महिला साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

प्रकट मुलाखत
दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते माधव अभ्यंकर(रात्रीस खेळ चाले अण्णा नाईक फेम)यांची प्रकट मुलाखत पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा.पिंगळे हे ही मुलाखत घेणार आहेत.
परिसंवाद
दुपारी ३ ते ५ दरम्यान समाजापुढील आजची आव्हाने आणि मार्ग या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. यामध्ये माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, माजी पोलीस अधिकारी सुषमा चव्हाण, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक श्रुती पानसे सहभागी होणार आहेत.



मान्यवरांचे कवी संमेलन
सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान मान्यवरांचे कवी संमेलन पार पडणार आहे यामध्ये कवी संमेलनाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी असणार आहेत तर ज्योत्स्ना चांदगुडे, उद्धव कानडे, प्रभा सोनवणे, राजेंद्र शहा, निरुपमा महाजन, धनंजय तळवळकर, बंडा जोशी, अनिल दीक्षित, चिन्मय चिटणीस, महेश कुलकर्णी, राजेंद्र वाघ, ज्योत्स्ना तानवडे, नंदकुमार बोधाई, अशोक शहा, बाबासाहेब जाधव, प्राजक्ता पटवर्धन, डॉ. प्रगती मोरे मेंगडे सहभागी होणारा सूत्र संचालन संदीप अवचट करणार आहेत.
बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित संगीतमय कार्यक्रम
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केतन भाटे यांनी संगीत दिले असून तृप्ती बाळ यांचे संहिता लेखन असणार आहे. गायक म्हणून सायली भाटे, चित्रा जोशी, चिन्मय दीक्षित, सायली वळसंगीकर सहभागी होणार आहेत.



संमेलनाच्या निमंत्रक ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर माधवी वैद्य व साहित्य कट्टा वारजेचे सचिव डी. के. जोशी असून ज्योत्स्ना चांदगुडे, गोपाळ कुलकर्णी ,उदय कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, नंदकुमार बोधाई, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा मानसी नलावडे, महादेव गायकवाड यांनी केले आहे.



